Nashik Update : अंबडमध्ये 9 वीतील विद्यार्थ्याची गळफास घेऊन आत्महत्या, परिसरात हळहळ

Nashik Update: A 9th grade student committed suicide by hanging himself in Ambad, causing a stir in the area.

Ambad Nashik News | Student Suicide Case | CIDCO Nashik | Nashik Update

नाशिक : अंबड औद्योगिक वसाहतीतील रमाबाई आंबेडकर नगर येथे राहणाऱ्या इयत्ता ९ वीतील विद्यार्थ्याने राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या केल्याची धक्कादायक घटना घडली आहे. या घटनेने परिसरात हळहळ व्यक्त होत असून, चुंचाळे पोलिस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

मृत विद्यार्थ्याचे नाव युवराज मंगल मगरे (वय १३) असे असून, तो आपल्या आई-वडील आणि तीन बहिणींसह राहात होता. सोमवारी (दि. 11 ऑगस्ट) सायंकाळी कुटुंबातील सर्वजण पांडवलेणा यात्रेसाठी गेले होते, तर युवराज घरीच राहिला होता. रात्री अंदाजे ९ वाजता कुटुंबीय घरी परतले असता, युवराजने किचन रूममध्ये गळफास घेतलेला आढळला.

घटनास्थळी पोलिसांनी तातडीने पंचनामा करून मृतदेह शवविच्छेदनासाठी पाठवला. आत्महत्येचे नेमके कारण अद्याप समजू शकलेले नाही. युवराज हा मनपा शाळेत इयत्ता ९ वी मध्ये शिक्षण घेत होता आणि घरातील एकुलता एक मुलगा होता.

मुख्य मुद्दे: (Nashik Update)

  • ठिकाण: रमाबाई आंबेडकर नगर, अंबड औद्योगिक वसाहत, नाशिक
  • मृत विद्यार्थी: युवराज मंगल मगरे (वय १३)
  • घटना: राहत्या घरी गळफास घेऊन आत्महत्या
  • तपास: चुंचाळे पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक विश्वास पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू