Shocking Nashik vehicle theft case : नाशिक गुन्हे शाखेची मोठी कारवाई: दुचाकी चोरी प्रकरणात दोन आरोपी ताब्यात, ७५,००० रुपयांच्या गाड्या जप्त

Nashik vehicle theft case

पोलीस आयुक्त संदीप कर्णिक यांच्या आदेशानंतर कारवाईला वेग

Nashik vehicle theft case : नाशिक शहरात वाढत्या दुचाकी चोरीच्या घटनांवर आळा बसवण्यासाठी नाशिक पोलीस आयुक्तालयाकडून कडक पावले उचलण्यात येत आहेत. पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, पोउप आयुक्त (गुन्हे) प्रशांत बच्छाव आणि सहायक पोलीस आयुक्त संदीप मिटके यांच्या सूचनेवरून गुन्हे शाखेला अधिक सक्रिय करण्यात आले आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.


गुप्त माहितीच्या आधारे अमरधाम परिसरात सापळा रचून कारवाई

गुन्हे शाखा युनिट २ चे पोहवा नंदकुमार नांदुर्डीकर व चंद्रकांत गवळी यांना मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे, दत्तमंदिर चौकाजवळील अमरधाम परिसरात चोरीच्या स्कुटीची विक्री (vehicle theft) होणार असल्याचे समजले.

सहायक पोलीस निरीक्षक हेमंत तोडकर यांच्या मार्गदर्शनाखाली पथकाने सापळा रचत कार्यवाही केली. या पथकात पोउनि यशवंत बेंडकोळी, सपोउनि गुलाब सोनार, पोहवा नांदुर्डीकर, गवळी, पोअंम प्रविण वानखेडे, तेजस मते आदींचा समावेश होता.


एक आरोपी व विधी संघर्षित बालक ताब्यात; दोन दुचाकी जप्त (vehicle theft)

या कारवाईत अनिकेत उर्फ सनी नंदराज आहिरे (वय २५, रा. मिशनमळा) व एक विधी संघर्षित बालक यांना ताब्यात घेण्यात आले.

तपासादरम्यान, ३५,००० रुपये किमतीची स्कुटी पेप (MH15 JE 4847) आणि पुढील चौकशीतून ४०,००० रुपये किमतीची हिरो होंडा सीडी डॉन दुचाकी पोलिसांनी जप्त केली. अशा प्रकारे एकूण ७५,००० रुपयांच्या दोन मोटारसायकली हस्तगत करण्यात आल्या.


सरकारवाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल

आरोपीच्या कबुलीनुसार, सरकारवाडा पोलीस ठाण्यात आधीच दाखल असलेला गुन्हा उघडकीस आला आहे. आरोपींचे सरकारवाडा पोलिसांकडे हस्तांतरण करण्यात आले असून, पुढील तपास सुरू आहे.

Nashik vehicle theft case

ही कामगिरी यशस्वी ठरवणारे पोलीस अधिकारी

गुन्हे शाखा युनिट २ चे प्रभारी अधिकारी हेमंत तोडकर, पोउनि यशवंत बेंडकोळी, सपोउनि गुलाब सोनार, पोहवा नांदुर्डीकर, गवळी, पोअंम विजय वरंदळ, प्रविण वानखेडे, तेजस मते, आणि सुनिल खैरनार यांनी ही उल्लेखनीय कामगिरी पार पाडली. वरिष्ठ अधिकाऱ्यांच्या मार्गदर्शनामुळेच ही कारवाई शक्य झाली, असे गुन्हे शाखेकडून सांगण्यात आले.


#NashikCrimeNews #MotorcycleTheft #NashikPoliceAction #CrimeBranchUnit2 #NashikUpdates #PoliceActionNews