नाशिक Nashik Water Projects: राज्यात दुष्काळमुक्त महाराष्ट्र (Dushkal Mukt Maharashtra) घडवण्यासाठी शासनाने मोठ्या प्रमाणावर जलसंपदा प्रकल्प (Water Resource Projects in Maharashtra) सुरू केले असून, या सर्व योजनांची कामे वेळेत पूर्ण करण्यासाठी शासन कटिबद्ध असल्याची माहिती जलसंपदा मंत्री राधाकृष्ण विखे पाटील (Water Resources Minister Radhakrishna Vikhe Patil) यांनी दिली.
उल्हास-वैतरणा-गोदावरी नदीजोड प्रकल्प कार्यालय (Ulhas-Vaitarna-Godavari River Linking Project Office) नाशिकमधील सिंचन भवनात उद्घाटन करताना ते बोलत होते. यावेळी मंत्री छगन भुजबळ, नरहरी झिरवाळ, ॲड. माणिकराव कोकाटे, तसेच विविध लोकप्रतिनिधी आणि अधिकारी उपस्थित होते.
प्रमुख मुद्दे : (Nashik Water Projects)
- 61 कोटींचा डीपीआर मंजूर : उल्हास-वैतरणा नदीजोड प्रकल्पाच्या DPR साठी ६१ कोटी रुपये मंजूर करण्यात आले असून, तो जानेवारी २०२६ पर्यंत शासनास सादर केला जाणार आहे.
- नदीजोड प्रकल्पांची यादी : दमणगंगा-एकदरे, दमणगंगा-वैतरणा-देवनदी-गोदावरी, पार-गोदावरी, उल्हास-वैतरणा-गोदावरी हे प्रकल्प राबवले जाणार आहेत.
- नाशिक, मराठवाडा, संभाजीनगरला फायदा : या योजनांमुळे कोरडवाहू भागात पाण्याची उपलब्धता वाढणार आहे.
- 90% केंद्र पुरस्कृत निधीची मागणी : या योजनांसाठी केंद्राकडून ९० टक्के निधी मिळवण्यासाठी प्रयत्न सुरू आहेत.
- गाळमुक्त धरणे व लायनिंग कामे सुरू : धरणांतील गाळ हटवणे आणि कालव्यांमधील गळती थांबवण्यासाठी तांत्रिक उपाययोजना सुरू आहेत.
- 30 प्रवाही वळण योजना प्रगतीपथावर : पश्चिम वाहिनी नद्यांचे पाणी गोदावरी खोऱ्यात वळवण्यासाठी या योजना कार्यान्वित आहेत.
- 90 TMC पाणी वळविण्याचे लक्ष्य : एकूण १२.४३ TMC (नदीजोड प्रकल्पांतून), आणि ५४.७० TMC (वैतरणा-उल्हास उपखोऱ्यातून) पाणी वळवण्याचे मोठे उद्दिष्ट शासनाने निश्चित केले आहे.