नाशिकरोड येथील गाडेकर मळा, सिन्नर फाटा परिसरातील नवविवाहित युवकाचा दुर्दैवी मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. अमित राजेंद्र मिश्रा (वय 29), इंदिरानगर येथील डब्लू एन एस या कंपनीत कार्यरत होता. तो सकाळी अकराच्या सुमारास आपल्या दुचाकीने (MH 15GS 2925) कामावर जात असताना, नाशिकरोड उड्डाणपुलावर पाठीमागून आलेल्या ट्रॅकने (MH 15FV 9891) त्याच्या दुचाकीला जबर धडक दिली.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
या अपघातात अमित याला गंभीर मार लागल्यामुळे त्याचा जागीच मृत्यू झाला. या दुर्दैवी घटनेने परिसरात शोककळा पसरली आहे. अमित हा नवविवाहित होता आणि त्याच्या पाठीमागे पत्नी, लहान मुलगा, आई-वडील आणि भाऊ असा कुटुंब आहे.
अपघातानंतर स्थानिक पोलीस घटनास्थळी दाखल झाले आणि पुढील तपास सुरू आहे. अमितच्या कुटुंबावर या घटनेमुळे दुःखाचा डोंगर कोसळला आहे, आणि स्थानिक नागरिकांतूनही हळहळ व्यक्त होत आहे.