Nashik Breaking : पंचवटीत वाहतुकीला अडथळा; पाच रिक्षाचालकांवर गुन्हा, पोलिसांची धडक कारवाई

नाशिक Nashik शहरातील दिंडोरी नाका परिसरात सार्वजनिक रस्त्याच्या मध्यभागी रिक्षा उभ्या करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्या पाच रिक्षाचालकांविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या कारवाईमुळे वाहतूक नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांमध्ये खळबळ उडाली आहे.

Nashik पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, ३० मे २०२६ रोजी सायंकाळी दिंडोरी नाका परिसरात विशेष तपासणी मोहीम राबविण्यात आली. यावेळी काही रिक्षाचालकांनी रस्त्याच्या मध्यभागी रिक्षा उभ्या करून वाहतुकीला अडथळा निर्माण केल्याचे निदर्शनास आले. त्यामुळे नागरिकांना तसेच वाहनचालकांना मोठ्या प्रमाणात गैरसोय होत होती.

या प्रकरणी बॉबी जगताप (उत्तमनगर, सिडको), प्रसाद धनगर (त्रिमूर्ती चौक, सिडको), देवराज चव्हाण (आदर्शनगर, रामवाडी), अय्युब दिलसाद शेख (जगतापवाडी, सातपूर) आणि शरद संतोष गुप्ता (काठे गल्ली, द्वारका) यांच्याविरुद्ध पंचवटी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलिसांनी संबंधित रिक्षाचालकांविरुद्ध कायदेशीर कारवाई सुरू केली असून, सार्वजनिक रस्त्यावर बेकायदेशीर पार्किंग करून वाहतुकीस अडथळा निर्माण करणाऱ्यांविरुद्ध यापुढेही कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचा इशारा दिला आहे.

दरम्यान, दिंडोरी नाका परिसर हा शहरातील अत्यंत वर्दळीचा भाग असल्याने येथे वाहतूक कोंडीची समस्या कायम असते. अशा परिस्थितीत नियमांचे उल्लंघन करणाऱ्यांवर कारवाई होत असल्याने नागरिकांनी समाधान व्यक्त केले आहे.