Nashik Road : डायमंड नगर येथे बिबट्याचा धुमाकूळ, महिलेवर हल्ल्याचा प्रयत्न (Leopard Attack)

Nashik Road, Diamond Nagar, Leopard Attack,

नाशिकरोड | आर्टिलरी सेंटरजवळील डायमंड नगर परिसरात बिबट्याने (Leopard) धुमाकूळ घालत एकाच रात्रीत घबराट निर्माण केली. या हल्ल्यात एक महिला थोडक्यात बचावली असून, नागरिकांनी वनविभागाकडे तातडीने पिंजरा लावण्याची मागणी केली आहे

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

बुधवारी पहाटे निवृत्त सुभेदार मेजर अजित राणा यांच्या सीसीटीव्हीत बिबट्याचा वावर स्पष्टपणे दिसून आला. अंदाजे आर्टिलरी सेंटरच्या मुख्य गेटपासून २०० मीटर अंतरावर असलेल्या डायमंड नगरमध्ये हा बिबट्या आल्याचे निदर्शनास आले.

बिबट्याने (Leopard) मधुकर सरदार यांच्या बंगल्याच्या गॅलरीत ठेवलेले कोंबड्यांचे खुराडे पाडले. यावेळी लक्ष्मी सरदार यांनी खिडकी उघडताच बिबट्याने अचानक हल्ला चढवला. मात्र, त्यांची आरडाओरड आणि लाईट लावल्याने बिबट्याने तेथून पळ काढला. त्यानंतर त्याने रोकडोबा वाडीतील विलास भालेराव यांच्या घराजवळ फेरफटका मारत बकऱ्यांच्या शेडभोवती फिरत असल्याचे नागरिकांनी पाहिले.

परिसरातील नागरिकांनी एकमेकांना फोन करून सतर्क केले. सर्वांनी घरातील लाईट लावून बिबट्याला (Leopard) हुसकावले, त्यामुळे तो पुन्हा आर्टिलरी सेंटरच्या जंगलात निघून गेला.

घटनेनंतर सामाजिक कार्यकर्ते विलास भालेराव यांनी वनविभागाशी संपर्क साधला. वनअधिकाऱ्यांनी घटनास्थळी पाहणी करून बिबट्या जेरबंद करण्यासाठी तातडीने पिंजरा लावण्याचे आश्वासन दिले.

डायमंड नगर आणि आजूबाजूच्या परिसरात बिबट्याचा Leopard मुक्त संचार सुरू असल्याने नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वनविभागाने तातडीने कारवाई करून बिबट्याला जेरबंद करावे, अशी मागणी होत आहे.