नाशिक रोड, प्रतिनिधी
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
नाशिकरोड, जेलरोड सह परिसरात आज अनुराधा नक्षत्राच्या मुहूर्तावर गौरींचे उत्साहात आगमन झाले. या माहेर वाशिनींना पहिल्या दिवशी मेथी भाकरीचा साधा नैवैद्य अर्पण करण्यात येऊन प्राणप्रतिष्ठा करण्यात आली. बुधवारी (दि.११) ज्येष्ठ नक्षत्रावर गौरीपूजन असून या वेळी पूरणपोळीचा महानैवेद्य दाखविण्यात येईल. त्यानंतर सवाष्ण महिलांचा हळदी कुंकू समारंभ होईल. मध्यरात्री देवीचा जागर व किर्तन झाल्यानंतर आरती केली जाईल. गुरूवारी (दि.१२) मूळ नक्षत्रावर दहीभाताचा नैवैद्य दाखवून विधीवत विसर्जन केले जाईल. गौरीपुढे पौराणिकसह विविध देखावे सादर केले जातात. कृष्णाच्या जन्मलिला, जेजुरीचा खंडेराय, कोल्हापूरची महालक्ष्मी, दक्षिणेची पदमावती देवी याबरोबरच निसर्गरम्य महाबळेश्वर आदी देखावेही साकारले जातात. अनेक घरी फुलांची आरस केली जाते. मंगळागौरीनिमित्त महिलांचे विविध खेळ व सांस्कृतिक कार्यक्रम होणार आहेत. गौरींच्या स्वागतसाठी महिलांची आठवडा भरापासून मोठी धावपळ सुरू होती.