Breaking NashikWaterAlert : नाशिककरांनो सावधान! 21 जून रोजी संपूर्ण पाणीपुरवठा बंद – स्मार्ट सिटी अंतर्गत मोठं काम सुरु

NashikWaterAlert

शनिवार पूर्ण पाणी बंद! रविवार कमी दाबाने – तातडीने पाण्याचा साठा करा

Update: 19 जून 2025 | Location: नाशिक
Breaking News | Trending #NashikWaterAlert

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

NashikWaterAlert , १९ जूननाशिक शहरातील नागरिकांसाठी एक महत्त्वाची सूचना आहे. शनिवार, दिनांक २१ जून २०२५ रोजी नाशिक शहराचा संपूर्ण पाणीपुरवठा बंद राहणार असून, रविवार २२ जून रोजी सकाळचा पाणीपुरवठा कमी दाबाने होईल. नागरिकांनी याची नोंद घ्यावी आणि मनपा प्रशासनास सहकार्य करावे, असे आवाहन नाशिक महानगरपालिका व नाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने करण्यात आले आहे.


काय कामं चालणार आहेत?

स्मार्ट सिटी अंतर्गत महत्त्वाची पाणीवहन प्रणाली सुधारणा

नाशिक स्मार्ट सिटी कंपनीच्या वतीने नाशिक मनपाच्या विविध जलशुध्दीकरण केंद्रे आणि बुस्टर पंपिंग स्टेशनवर सुधारणा व विकास कामं सुरू आहेत. यामध्ये मुख्यत्वे:

  • नवीन व्हॉल्व्स (Valves) बसविणे
  • फ्लो मीटर्स (Flow Meters) बसविणे
  • पाइपलाइनची दुरुस्ती व बदल

या कामांसाठी शटडाऊन घेणे आवश्यक असल्याने शनिवार, २१ जून रोजी सकाळी ९ ते सायंकाळी ६ वाजेपर्यंत शहराचा पाणीपुरवठा पूर्णतः बंद राहणार आहे.


नागरिकांसाठी सूचना

पाण्याचा साठा करून ठेवा – मनपाचे आवाहन

नाशिक मनपाचे आवाहन:
नागरिकांनी शुक्रवार २० जूनच्या रात्रीपर्यंत आवश्यकतेनुसार पाण्याचा साठा करून ठेवावा, जेणेकरून शटडाऊनच्या दिवशी कोणतीही गैरसोय होणार नाही.

रविवारी कमी दाबाने पाणी येणार

रविवार, २२ जून रोजी सकाळी पाणीपुरवठा सुरू होईल, मात्र तो कमी दाबाने होणार असल्याने वापर मर्यादित ठेवावा, असेही प्रशासनाने सांगितले आहे.