Navale Colony Murder Case: नवले कॉलनीजवळील नोट प्रेसच्या मोकळ्या मैदानात एका पुरुषाचा मृतदेह आढळून आल्याने शहरात खळबळ उडाली. घटनेची माहिती मिळताच नाशिकरोड पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. मृत व्यक्तीच्या शरीरावर गंभीर जखमा आढळून आल्याने त्याला तातडीने बिटको हॉस्पिटलमध्ये नेण्यात आले, मात्र डॉक्टरांनी त्याला मृत घोषित केले.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
प्राथमिक तपासात ही हत्या असल्याचे स्पष्ट झाल्याने पोलिसांनी भादंवि कलम ३०२ (१) अन्वये गुन्हा दाखल करून तात्काळ तपास सुरू केला.
Navale Colony Murder Case सीसीटीव्ही फुटेजमधून मिळाले महत्त्वाचे धागेदोरे
पोलीस आयुक्त संदीप कर्णिक, उप आयुक्त मोनिका राऊत आणि सहायक पोलीस आयुक्त डॉ. सचिन बारी यांच्या मार्गदर्शनाखाली नाशिकरोड पोलीस ठाण्याच्या गुन्हे शोध पथकाने तपासाची चक्रे फिरवली. परिसरातील सीसीटीव्ही फुटेजच्या मदतीने काही संशयितांवर लक्ष केंद्रीत करण्यात आले.
गोपनीय माहितीच्या आधारे देवी चौक आणि आशा नगर भागात शोधमोहीम राबवली असता, नाशिकरोड रेल्वे स्टेशन परिसरात चार संशयित हाती लागले. चौकशीत त्यांनी एक वर्षापूर्वी मयत अजय शंकर भंडारी (वय ३५, रा. विष्णुनगर, स्टेशनवाडी, सिन्नर फाटा) याने एका विधीसंघर्षित बालकाच्या भावाला मारहाण केल्याचा राग मनात ठेवून हत्या केल्याची कबुली दिली.
चार आरोपी ताब्यात, पुढील तपास सुरू
या प्रकरणात तीन विधीसंघर्षित बालकांना त्यांच्या पालकांच्या उपस्थितीत ताब्यात घेण्यात आले असून, प्रमुख आरोपी तुषार संजय खरे (वय १८, रा. देवी चौक, नाशिकरोड) याला अटक करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप यांच्या मार्गदर्शनाखाली सुरू आहे.
पोलीस तपासात कोण होते प्रमुख योगदानकर्ता?
या यशस्वी कारवाईत वरिष्ठ पोलीस निरीक्षक अशोक गिरी, पोलीस निरीक्षक बडेसाब नाईकवडे, पोलीस निरीक्षक विश्वजीत जगताप यांसह सपोनि प्रविण सूर्यवंशी, पोउनि संदीप पवार, पोलीस हवालदार अविनाश देवरे, विजय टेमगर, रोहित शिंदे, पोलीस शिपाई विशाल कुवर, समाधान वाजे, नाना पानसरे आणि अजय देशमुख यांनी महत्त्वाची भूमिका बजावली.
(Tag: #NashikCrime #MurderCase #PoliceInvestigation #NashikNews)