नवरात्रातील पाचवा दिवस हा स्कंदमाता (skandmata) देवीला समर्पित आहे. दुर्गा देवीचे स्कंदमाता स्वरुप प्रेम आणि वात्सल्याचे प्रतीक मानले जाते. स्कंदमाता कुमार कार्तिकेयाची माता असल्याची मान्यता आहे. कुमार कार्तिकेयांना स्कंद असेही संबोधले जाते. म्हणूनच देवीच्या या स्वरुपाला स्कंदमाता म्हटले जाते. कुमार कार्तिकेयाने देवासुर संग्रामात देवतांच्या सेनापतीची धुरा सांभाळली होती. स्कंदमाता चतुर्भुज आहे. कुमार कार्तिकेय मातेसोबत आहेत. तसेच देवीच्या हातांमध्ये कमळाचे फूल आहे. देवीचे वाहन सिंह आहे. स्कंदमाता सौरमंडळाची अधिष्ठात्री आहे.
देवी स्कंदमातेचे वाहन सिंह आहे. या दिवशी खालील मंत्राच्या जपाने मातेची पूजा केली जाते. पंचमी तिथीची प्रमुख देवता देवी स्कंदमाता आहे, म्हणून ज्यांना संततीची इच्छा आहे त्यांनी देवीची पूजा करून आणि मंत्रजप केल्याने फायदा होऊ शकतो.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
स्कंदमातेचे मंत्र-(skandmata Mantra)
- या देवी सर्वभूतेषु माँ स्कंदमाता रुपं संस्थिता ।
नमस्तेस्ये नमस्तेस्ये नमस्तेस्ये नमो नमः ।