नाशिक( प्रतिनिधी),:राष्ट्रवादी काँग्रेस पक्ष व राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेसच्या संयुक्त विद्यमाने आयोजित “अजिंक्य घड्याळ विद्यार्थी संवाद” कार्यक्रम बलकवडे स्टेडियम येथे प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाला. ग्रीको-रोमन राज्यस्तरीय अजिंक्यपद कुस्ती स्पर्धेच्या निमित्ताने हा संवाद झाला.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
प्रदेशाध्यक्ष प्रशांत कदम यांनी या वेळी विद्यार्थ्यांशी संवाद साधताना विद्यार्थ्यांना जीवनातील यशासाठी कागदावरच्या गुणांपेक्षा रक्तातील गुणांना महत्व देण्याचे आवाहन केले. त्यांचे सूचक विधान होते, “विद्यार्थ्यांनी कागदावर पडलेल्या गुणांपेक्षा रक्तातील गुणांना जास्त वाव देण्याची आज गरज आहे.”
या प्रसंगी उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी १०व्या अर्थसंकल्पात विद्यार्थ्यांसह युवक, महिला, आणि शेतकऱ्यांच्या सर्वांगीण विकासासाठी घेतलेल्या निर्णयांवर सविस्तर चर्चा केली. त्यांनी खेळाडूंसाठी तालुका व जिल्हा स्तरावर सर्व सुविधा उपलब्ध करून देण्यासाठी प्रयत्नशील राहण्याचे आश्वासन दिले. यावेळी, क्रीडा मंत्री संजय बनसोडे आणि स्पोर्ट्स अकादमी ऑफ इंडिया यांच्याकडून खेळाडूंना पाठबळ दिले जाणार असल्याचेही सांगण्यात आले.
कुस्ती स्पर्धेच्या आयोजनामध्ये राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे महिला जिल्हाध्यक्ष प्रेरणाताई बलकवडे आणि कुस्तीगीर संघटनेचे जिल्हाध्यक्ष विशाल बलकवडे यांनी महत्त्वाची भूमिका बजावली. या प्रसंगी उपस्थित कुस्तीपटूंनी अजित पवार यांच्या निर्णयांचे स्वागत करत स्वाक्षरी अभियान राबवून त्यांना पाठिंबा दर्शवला.
कार्यक्रमास राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे जिल्हाध्यक्ष विष्णुपंत म्हैसधुने, सोमनाथ बोराडे, युवक अध्यक्ष योगेश निसाळ, विद्यार्थी अध्यक्ष अजय खांडबहाले, प्रसाद दळवी, रमेश पवार, मोहन गायकवाड, विलास कड, दिलीप सोनवणे यांसारख्या मान्यवरांची उपस्थिती होती.