शिवसेना (ठाकरे गट) नेते संजय राऊत यांनी पुण्यातील बोपदेव घाटात झालेल्या सामूहिक बलात्काराच्या घटनेवर तीव्र प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. त्यांनी या प्रकरणातील आरोपींचा तातडीने एन्काऊंटर करण्याची मागणी केली आहे. “बदलापूरमध्ये जसा एन्काऊंटर करण्यात आला, तसाच पुण्यातील या घटनेतील दोषींवर कारवाई केली जावी,” असा थेट हल्लाबोल संजय राऊत यांनी महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर केला आहे.
राऊत म्हणाले, “सामूहिक बलात्कारासारख्या क्रूर घटनांवर कठोर कारवाई करणे आवश्यक आहे. देवेंद्र फडणवीस यांनी सिंघमच्या पोस्टरमधून बाहेर येऊन पुण्यातील आरोपींचाही एन्काऊंटर करावा. महिलांच्या सुरक्षेसाठी असे कृत्य करणाऱ्यांना कुठलाही दिलासा मिळता कामा नये.”
राऊत यांच्या या मागणीमुळे महाराष्ट्राच्या राजकीय वर्तुळात चर्चेला उधाण आले आहे.