नाशिक न्यूज | होरायझन अकॅडमीमध्ये इंग्रजी संप्रेषण कौशल्य कार्यशाळा
नाशिक –New Education Policy “आजचे शिक्षक प्रशिक्षण हे केवळ अध्यापन पद्धती सुधारण्यापुरते मर्यादित नसून विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी पायाभरणी करणारे आहे. नवीन शैक्षणिक धोरणाच्या (NEP) अनुषंगाने गुणवत्तापूर्ण शिक्षणासाठी शिक्षकांना इंग्रजी संप्रेषण कौशल्य विकसित करणे ही काळाची गरज आहे,” असे प्रतिपादन मविप्रचे सरचिटणीस ॲड. नितीन ठाकरे यांनी केले.
ते मविप्रच्या ओझरमिग येथील होरायझन अकॅडमीमध्ये आयोजित शिक्षक प्रशिक्षण कार्यशाळेच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.
इंग्रजी अध्यापन अधिक आकर्षक व विद्यार्थी-अनुकूल करण्यावर भर
कार्यक्रमाच्या प्रमुख पाहुण्यांमध्ये मविप्र संस्थेचे उपसभापती डी. बी. मोगल, निफाड तालुक्याचे संचालक शिवाजी गडाख, शिक्षणाधिकारी डॉ. कैलास शिंदे, शशिकांत मोगल आदी मान्यवर उपस्थित होते.
मुख्याध्यापिका मीरा पांडे यांनी सांगितले की, या प्रशिक्षणाचा मुख्य उद्देश म्हणजे इंग्रजी व्याकरण व शब्दसंग्रह वाढवून अध्यापन अधिक आकर्षक, विद्यार्थी-अनुकूल आणि भविष्याभिमुख करणे हा आहे.
तज्ज्ञांचे मार्गदर्शन व शिक्षकांचा उत्स्फूर्त सहभाग (New Education Policy)
प्रमुख वक्ते म्हणून डॉ. शरद बिन्नोर, डॉ. प्रणाली जाधव, वैशाली रणदिवे, अनिल बच्चाटे, डॉ. अश्विनी कदम, डॉ. सोनिया बैरागी, अजित रकिबे आणि जयश्री गोवर्धने यांनी मार्गदर्शन केले.
कार्यशाळेत एकूण ९५ शिक्षकांनी सक्रिय सहभाग नोंदवला.