Manisha Khatri : नाशिकच्या आयुक्तपदी मनीषा खत्री: पहिल्याच दिवशी कामाचा धडाकेबाज प्रारंभ

नाशिकच्या आयुक्तपदी मनीषा खत्री: पहिल्याच दिवशी कामाचा धडाकेबाज प्रारंभ

Nashik : नाशिक महानगरपालिकेच्या आयुक्तपदी नुकत्याच नियुक्त झालेल्या मनीषा खत्री (Manisha Khatri) यांनी अवघ्या काही तासांतच पदभार स्वीकारला असून पहिल्याच दिवशी त्यांनी कामाचा जोरदार श्रीगणेशा केला. आयुक्त खत्री यांनी पदभार स्वीकारताच सर्व विभागप्रमुखांची बैठक बोलावली आणि महानगरपालिकेच्या कार्यपद्धतीचा आढावा घेतला. यानंतर त्यांनी शहरातील विविध प्रकल्प आणि समस्या जाणून घेण्यासाठी प्रत्यक्ष स्थळभेटीही केल्या.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

डॅशिंग महिला आयुक्ताचे (Manisha Khatri) स्वागत

आयुक्त मनीषा खत्री (Manisha Khatri)यांच्या नेतृत्वामुळे नाशिकला एक डॅशिंग महिला प्रशासक लाभल्याचे बोलले जात आहे. त्यांचे सर्व स्तरातून स्वागत होत असून त्यांच्या धडाकेबाज कामकाजाची सुरुवात शहरासाठी सकारात्मक संकेत देत आहे.

आमदार सीमा हिरे यांची सदिच्छा भेट

आयुक्त मनीषा खत्री(Manisha Khatri) यांना शुभेच्छा देण्यासाठी नाशिक पश्चिम विधानसभा मतदारसंघाच्या आमदार सीमा हिरे यांनी भाजपच्या माजी नगरसेवकांसह भेट घेतली. या भेटीत आमदार हिरे यांनी मतदारसंघातील समस्या मांडल्या.

मुख्य समस्या:

कमी दाबाने व कमी वेळेसाठी होणारा पाणीपुरवठा

सिडको-सातपूर भागातील रस्त्यांची दुरवस्था

विविध स्थानिक समस्या

आयुक्त खत्री (Manisha Khatri)यांनी या सर्व समस्या गांभीर्याने ऐकून त्यांच्या सोडवणुकीसाठी तत्काळ उपाययोजना करण्याचे आश्वासन दिले.

भाजप पदाधिकाऱ्यांची उपस्थिती

आयुक्तांना भेटण्यासाठी आमदार हिरे यांच्यासह भाजपचे प्रमुख पदाधिकारी व कार्यकर्ते मोठ्या संख्येने उपस्थित होते. यामध्ये भाग्यश्री डोमसे, माधुरी बोलकर, छाया देवांग, रंजना पवार, मुकेश सहाने, राकेश दोंदे, भगवान दोंदे आदींचा समावेश होता.