नाशिक महानगरपालिका आयुक्त मनिषा खत्री (Manisha Khatri) यांच्या हस्ते प्रजासत्ताक दिन २०२५ चा ७५ वा वर्धापन सोहळा उत्साहात संपन्न. बेटी बचाओ-बेटी पढाओ व माझी वसुंधरा प्रतिज्ञा, तसेच पर्यावरणप्रेमी सायकल रॅलीचा शुभारंभ.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
नाशिक: भारतीय प्रजासत्ताक दिनाचा ७५ वा वर्धापन सोहळा नाशिक महानगरपालिका आयुक्त व प्रशासक माननीय मनिषा खत्री (Manisha Khatri) यांच्या शुभहस्ते २६ जानेवारी २०२५ रोजी मोठ्या उत्साहात राजीव गांधी भवन येथे संपन्न झाला.
ध्वजवंदनानंतर देशभक्तीपर गीते व प्रेरणादायी भाषणांनी कार्यक्रमाला विशेष रंगत आली. यावेळी “बेटी बचाओ, बेटी पढाओ” व “माझी वसुंधरा, तिचे रक्षण करा” या सामाजिक मोहिमांना प्रोत्साहन देत, उपस्थित अधिकारी व कर्मचाऱ्यांनी शपथ घेतली.
कार्यक्रमाचा मुख्य आकर्षण ठरलेली सायकल रॅली आयुक्त खत्री (Manisha Khatri) यांनी हिरवा झेंडा दाखवून सुरू केली. ही रॅली पर्यावरण संवर्धनाचा संदेश देत शहरभर फिरली.
राजीव गांधी भवनात उपस्थितांनी देशसेवेची भावना जागृत करत, सामाजिक कार्यासाठी बांधिलकी व्यक्त केली. या सोहळ्याने नाशिककरांच्या मनात अभिमानाची भावना निर्माण केली आहे.