NMC : भाजपाचे नाशिक मनपा आयुक्तांना समस्यांबाबत निवेदन.

Nashik bjp NMC aayukt nivedan

समस्यांचे निराकरण न केल्यास मनपा प्रशासनाविरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार – प्रशांत जाधव.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Nashik – NMC नाशिक महानगरपालिकेत फेब्रुवारी 2022 पासून प्रशासकिय राजवट असून या काळात भुखंड घोटाळयासह अनेक तक्रारी वाढल्या आहेत.मागील महिन्यात भाजपाचे आमदार व पदाधिकाऱ्यांनी आयुक्त डॉ.अशोक करंजकर यांना भेटून शहरातील सर्व समस्यांचा पाढा सादर केला होता. मनपाने या सर्व समस्या न सोडवील्यास व काही ठराविक विकासक व माजी नगरसेवकांच्या माध्यमातून केलेले गैरव्यवहार न थांबवल्यास मनपा विरोधात मुख्यमंत्र्यांकडे तक्रार करणार असल्याचे यावेळी सांगितले होते.तरी सुध्दा परिस्थितीत काही सुधारणा होत नसुन तक्रारी वाढतच आहेत. नाशिक मनपा हद्दीतील सर्व समस्यांचे निवेदन शहरातील सर्व 9 मंडल अध्यक्ष यांनी एकत्रित करून मनपा उपायुक्त लक्ष्मीकांत साताळकर यांना सविस्तरपणे निवेदन देण्यात आले. आयुक्त उपस्थित नसल्यामुळे उपायुक्त साताळकर यांनी निवेदन स्विकारले. पुन्हा एकदा बैठक घेवून संबंधीत सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांना बोलवून आयुक्तांसमवेत बैठक बोलवावी असे भाजपा अध्यक्ष प्रशांत जाधव यांनी सागितले. उपायुक्त यांनी त्याबाबत दखल घेवून पुन्हा सर्व विभागाच्या अधिकाऱ्यांबरोबर बैठक घेवून सर्व समस्या सोडविल्या जातील असे आश्वासन दिले.

1000268634

NMC : भाजपाचे नाशिक मनपा आयुक्तांना समस्यांबाबत निवेदन.

प्रामुख्याने शहरात अनावश्यक ठिकाणी टाकलेले चुकीचे स्प्रिड ब्रेकर काढणे त्यामुळे वाढलेले अपघात व इजा कमी करणे, शहरातील सर्वत्र कमी दाबाने होणारा पाणी पुरवठा सुधारणे व सर्व नाशिककरांना पाणी गळती थांबवून मुबलक व पुरेसे पाणी देणे, स्वच्छतेबाबत मनपा निष्क्रिय असून शहरात जागोजागी ब्लॅक स्पॉट व वाढलेले कचऱ्यांचे ढिग याबाबत लक्ष देणे, संपुर्ण शहरातील रस्त्यांवर ठिकठिकाणी मोठ मोठे खड्डे पडले असून त्यामुळे वाढलेले अपघात व वाहनांचे होणारे नुकसान याकडे गांभीर्याने लक्ष देणे, शहरातील वाढलेल्या बांधकामांमुळे रस्त्यावर मातीचे साम्राज्य व विकासकांनी पाईपलाईन, ड्रेनेज, लाईट या करिता खणलेले रस्ते व त्यामुळे नागरिकांना होणारा त्रास, नाशिक मनपाने शहरातील समस्यांबाबत नागरिकांना जे मोबाईल क्रमांक दिलेले आहेत. त्याची अद्यापही दखल घेतलेली नाही या क्रमांकावर नागरीकांनी सुचना करुनही अद्याप त्या समस्या सोडविणची कोणतीही उपाय योजना केलेली नाही, भुखंड घोटाळे या व अशा सर्व तक्रारी त्वरीत सोडवाव्या. मनपा आयुक्तांनी यात जातीने लक्ष घालावे अन्यथा प्रशासनाच्या अनागोंदी कारभाराबाबत मुख्यमंत्र्यांकडे दाद मागणार असल्याचे भाजपा अध्यक्ष प्रशांत जाधव यांनी सांगितले.

याप्रसंगी भाजपा अध्यक्ष प्रशांत जाधव, सरचिटणीस सुनिल केदार, काशिनाथ शिलेदार, रोहिणी नायडू, ॲड.श्याम बडोदे, मंडल अध्यक्ष चंद्रशेखर पंचाक्षरी, राम डोबे, सुनिल देसाई, भास्कर घोडेकर, भगवान काकड, रविंद्र पाटील, अविनाश पाटील, ज्ञानेश्वर काकड, सचिन मोरे, अमोल गांगर्डे, राहुल कुलकर्णी आदी उपस्थित होते.

हे पण वाचा : NMC : नाशिक महापालिका निवडणूक : भाजपच्या 100 जागांचा निर्धार, पण आव्हाने (Challenge) मोठी!