NMC : इंदिरानगर प्रभाग 31 : रस्त्यांची दुरवस्था आणि अपुऱ्या पाणीपुरवठ्यावर माजी नगरसेवक पुष्पा आव्हाड यांची मनपा आयुक्तांकडे तक्रार

Clash Between Local and Outsourced Officers

नाशिक NMC– इंदिरानगर प्रभाग क्रमांक 31 मधील रस्त्यांची बिकट अवस्था आणि कमी दाबाने होणाऱ्या पाणीपुरवठ्यामुळे नागरिक त्रस्त झाले आहेत. या समस्यांकडे लक्ष वेधण्यासाठी माजी नगरसेवक पुष्पा आव्हाड यांनी मनपा(NMC ) आयुक्त मनीषा खत्री यांना निवेदन सादर केले आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

जुनी जलवाहिनी नागरिकांसाठी अपुरी

प्रभाग क्रमांक 31 हा भौगोलिकदृष्ट्या मोठा असून, यामध्ये उपनगरे आणि मळे परिसर देखील येतात. जुनी जलवाहिनी लोकसंख्येच्या वाढत्या प्रमाणानुसार अपुरी पडत आहे, त्यामुळे नागरिकांना पुरेसे पाणी मिळत नाही. या समस्येवर तोडगा म्हणून मोठ्या व्यासाची नवीन जलवाहिनी बसवावी, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली आहे.

रस्त्यांची दुरवस्था : अपघातांना आमंत्रण

प्रशांतनगर, स्वराजनगर आणि संपूर्ण परिसरातील मुख्य तसेच अंतर्गत रस्त्यांची दुरवस्था झाली आहे. त्यामुळे वाहनधारकांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे. खराब रस्त्यांमुळे दररोज अपघात होत आहेत, यामुळे नागरिकांमध्ये संतापाचे वातावरण आहे.

मनपाने त्वरित उपाययोजना करावी

चेतनानगर, वासननगर आणि सदिच्छानगर या भागांमध्येही मोठ्या व्यासाची जलवाहिनी टाकून पाणीपुरवठा सुरळीत करावा आणि परिसरातील रस्त्यांची त्वरित डागडुजी करावी, अशी मागणी पुष्पा आव्हाड यांनी केली आहे.

नागरिकांच्या समस्या सोडवण्यासाठी मनपा प्रशासन कोणती भूमिका घेते, हे पाहणे महत्त्वाचे ठरणार आहे.