नवीन नासिक (सिडको) येथील स्वामी विवेकानंद नगर राणेनगर भागात रस्त्यावर पावसाच्या पाण्याने खड्डे

नवीन नासिक (सिडको) येथील स्वामी विवेकानंद नगर राणेनगर भागात रस्त्यावर पावसाच्या पाण्याने खड्डे

नवीन नासिक (सिडको) येथील स्वामी विवेकानंद नगर राणेनगर भागात रस्त्यावर पावसाच्या पाण्याने खड्डे ठिकठिकाणी तयार झाले असून दुचाकी चालकांचे अपघाताच्या प्रमाणात वाढ होत आहे. येथील रहिवासी या खड्ड्यांच्या समस्याने त्रस्त झाले असून महापालिकेने खड्डे बुजवण्याचे काम त्वरित हाती घेण्याची मागणी नागरिकांनी केली आहे.
तसेच सिडको भागात राणे नगर बस स्टॉप येथे पिकप शेड असून या ठिकाणी गवताचे प्रमाण वाढले आहे त्यामुळे येथील विद्यार्थी व कामगार प्रवासी बसची वाट बघत असताना त्यांना पिकप शेडमध्ये थांबणे मुश्किल झाले आहे डासांचे प्रमाण वाढले आहे, सिडकोच्या ठिकठिकाणी गवतांचे प्रमाणात वाढ झाली असून त्यामुळे संपूर्ण नाशिक शहरात डेंगूंच्या प्रमाणात वाढ होत असून सिडकोमध्ये मनपाच्या वतीने स्वामी विवेकानंद नगर राणे नगर भागात फवारणी वेळेवर करण्यात येत नाही असे येथील नागरिकांचे म्हणणे आहे.
नवीन नासिक सिडको महापालिकेच्या वतीने खड्डे व वेळेवर डासांची फवारणी करण्याचे समस्या सोडवण्याची मागणी नागरिकांकडून होत आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Leave a Reply