Ozar Airport Nashik | ओझर विमानतळावर नवीन धावपट्टीसाठी 343 कोटींची निविदा जाहीर

Ozar Airport Nashik | Tender for new runway at Ozar Airport announced for Rs 343 crore

काम सुरू होणार लवकरच; मंत्री छगन भुजबळ यांच्या प्रयत्नांना यश

नाशिक : Ozar Airport Nashik नाशिकच्या ओझर विमानतळावर 343 कोटी रुपये खर्चून नवीन धावपट्टी उभारण्यात येणार आहे. यासाठीची निविदा प्रक्रिया सुरू झाली असून, लवकरच कामाला सुरुवात होणार आहे. राज्याचे अन्न नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी या प्रकल्पासाठी सातत्याने पाठपुरावा केल्यामुळे हा प्रकल्प शक्य झाला आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

विमानसेवा विस्तारासाठी मोठे पाऊल

Ozar Airport Nashik – वाढत्या विमान वाहतुकीच्या पार्श्वभूमीवर नाशिक विमानतळाची क्षमता वाढवणे आवश्यक होते. त्यामुळे हिंदुस्तान एरोनॉटिक्स लिमिटेड (HAL) मार्फत विद्यमान धावपट्टीला समांतर नवीन धावपट्टी उभारण्याचा निर्णय घेण्यात आला. HALच्या संचालक मंडळानेही यास मान्यता दिली असून, निधीही मंजूर करण्यात आला आहे.

धावपट्टी प्रकल्पासाठी डीपीआर आणि सर्वेक्षण पूर्ण

नवीन धावपट्टीसाठी सविस्तर तांत्रिक सर्वेक्षण आणि प्रकल्प अहवाल (DPR) तयार करण्यात आला आहे. या प्रक्रियेनंतर आता तांत्रिक निविदा काढण्यात आली असून, कामकाज लवकरच सुरू होणार आहे. या धावपट्टीमुळे विमानतळ सक्रिय ठेवूनच डागडुजी करता येणार आहे – जी एक महत्त्वाची बाब आहे.

नाशिककरांसाठी महत्त्वाचे प्रकल्प

या प्रकल्पामुळे भविष्यातील विमानसेवा सुलभ होणार असून, नाशिक विमानतळाच्या व्यावसायिक व प्रवासी उड्डाण क्षमतेत मोठी वाढ होणार आहे. ही धावपट्टी कार्यान्वित झाल्यानंतर नाशिक शहरातील राष्ट्रीय व आंतरराष्ट्रीय विमान सेवा वाढण्याची शक्यता असून, पर्यटन, उद्योग व व्यापार क्षेत्रालाही मोठा बूस्ट मिळणार आहे.