केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांच्या दौऱ्यात कृषीमंत्री तथा पालकमंत्री Palakmantri असा उल्लेख
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
नाशिक । जिल्ह्याच्या पालकमंत्री Palakmantri पदावरून महायुतीतील तिन्ही पक्षांमध्ये जोरदार रस्सीखेच सुरू असतानाच केंद्रीय मंत्री पीयुष कुमार गोयल यांच्या नुकत्याच झालेल्या दौऱ्यात कृषीमंत्री तथा पालकमंत्री असा उल्लेख करण्यात आल्याने अॅड. माणिकराव कोकाटे Manikrao Kokate हे नाशिकचे पालकमंत्री असतील का, याबाबत चर्चा जोर धरू लागली आहे.
राज्य मंत्रिमंडळाचा नुकताच विस्तार झाल्यानंतर मंत्रीमंडळातील खाते वाटप ठरले आहे. मात्र, नाशिकसह पुणे, मुंबई, छत्रपती संभाजी नगर जिल्ह्यांच्या पालकमंत्री Palakmantri पदांसाठी राजकीय गोटात चुरस सुरू आहे. “ज्याचे जास्त आमदार त्याचा पालकमंत्री” या सूत्रानुसार नाशिक जिल्ह्यात राष्ट्रवादीचे ७, भाजपचे ५ आणि शिवसेनेचे २ आमदार असल्याने राष्ट्रवादीचे पारडे जड असल्याचे बोलले जात आहे.
भाजप आमदारांचा पालकमंत्री पदासाठी आग्रह
जिल्ह्यात भाजपचे ५ आमदार असूनही मंत्रिपद न मिळाल्यामुळे आगामी महापालिका आणि जिल्हा परिषदेच्या निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपचाच पालकमंत्री Palakmantri असावा, असा भाजप आमदारांचा आग्रह आहे. त्याचबरोबर जेष्ठत्वाचा मुद्दा पुढे करत मंत्री दादा भुसेही या पदासाठी प्रयत्नशील आहेत.
कुंभमेळ्याच्या पार्श्वभूमीवर Palakmantri पदाचे महत्व
कुंभमेळ्याच्या नियोजनाच्या दृष्टीने नाशिकच्या पालकमंत्री palakmantri पदाला विशेष महत्त्व आहे. अशा परिस्थितीत कोणाला या पदावर नियुक्त केले जाईल, याकडे साऱ्या राजकीय वर्तुळाचे लक्ष लागले आहे.
केंद्रीय मंत्री गोयल यांच्या दौऱ्यातील उल्लेख
जिल्हा प्रशासनाने केंद्रीय मंत्री पीयुष गोयल यांच्या दौऱ्याचे नियोजन करताना कृषीमंत्री तथा पालकमंत्री असा उल्लेख केला होता. या उल्लेखामुळे अॅड. माणिकराव कोकाटे नाशिकचे पालकमंत्री असतील का, असे प्रश्न निर्माण झाले. मात्र, नंतर हा शब्द काढून टाकण्यात आला.
राष्ट्रवादीकडे पालकमंत्री पद जाण्याचे संकेत?
जिल्हा प्रशासनाकडून पालकमंत्र्यांची नियुक्ती अद्याप झालेली नसताना या पदासाठी राष्ट्रवादीचे पारडे जड मानले जात आहे. या पार्श्वभूमीवर पालकमंत्री पदाबाबत महायुतीतील अंतर्गत राजकारण अधिक चिघळण्याची शक्यता आहे.
He Pan Wacha : नाशिकच्या पालकमंत्रीपदासाठी महायुतीतील नेत्यांमध्ये चुरस: महाजन, भुजबळ, आणि भुसे यांची शर्यत