Pankaja Munde: नेतृत्व उंच असायला हवं!– पंकजा मुंडेंचा कार्यकर्त्यांना भावनिक सल्ला

पंकजा मुंडे जालना येथील सत्कार सोहळ्यात भाषण देताना, कार्यकर्त्यांना "माझ्यापेक्षा मनाने, विचारांनी आणि आचारांनी उंच नेतृत्व लाभो" असा संदेश देताना. त्यांच्या डोळ्यांत गोपीनाथ मुंडेंच्या आठवणींचा भाव, तसेच धनंजय मुंडे यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया व्यक्त करताना दृढ आणि आत्मविश्वासपूर्ण मुद्रा.

जालना: शिवसेनेच्या वतीने आयोजित सत्कार सोहळ्यात राज्याच्या पर्यावरण मंत्री तथा पालकमंत्री पंकजा मुंडे (Pankaja Munde) यांनी भावनिक भाषण करत कार्यकर्त्यांना महत्त्वाचा संदेश दिला. आपल्या कार्यकर्त्यांच्या डोळ्यांत गोपीनाथ मुंडे दिसतात असं सांगत त्यांनी पक्षनिष्ठांना प्रेरित केलं.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

यावेळी बोलताना पंकजा मुंडे (Pankaja Munde) म्हणाल्या,
“माझ्यापेक्षा मनाने उंच, विचारांनी उंच, आचारांनी उंच नेतृत्व लाभो. राजकारण म्हणजे गढूळ पाण्यात कपडे धुण्यासारखं आहे,असं म्हणत त्यांनी राजकीय आरोप-प्रत्यारोपांबाबत खंत व्यक्त केली.

गोपीनाथ मुंडे माझ्या प्रत्येक गोष्टीकडे लक्ष द्यायचे. माझं कसं बोलणं आहे, चाल कशी आहे, हे सगळं ते पाहायचे .असं सांगताना त्या भावूक झाल्या. तुमच्या नजरेत मला गोपीनाथ मुंडे दिसतात. ही नजर खाली जाऊ नये म्हणून मी राजकारणात आहे, असे ठामपणे सांगत त्यांनी कार्यकर्त्यांशी नाळ जोडली.

मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्र्यांनी अद्याप धनंजय मुंडे प्रकरणाचा थेट विचार केलेला नाही,असे स्पष्ट करत त्यांनी विषयावर भाष्य केले. अजित पवारांनी स्पष्ट सांगितलंय की जर संबंध आढळले, तर योग्य ती कारवाई केली जाईल.

तुम्ही तुमच्या मुलांना आणि नातवंडांना अभिमानाने सांगता यावं की ही पंकजाताई!” असे म्हणत त्यांनी कार्यकर्त्यांशी भावनिक संवाद साधला.