हर्षवर्धन पाटील पुन्हा एकदा महाराष्ट्राच्या राजकारणात चर्चेचा विषय बनले आहेत. भाजपाला राम राम ठोकून आता ते शरद पवार यांच्या राष्ट्रवादी काँग्रेस पक्षात (शरद पवार गट) प्रवेश करण्याच्या तयारीत आहेत. २०१९ च्या विधानसभा निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादी काँग्रेस सोडून त्यांनी भाजपात जाऊन मोठा राजकीय धक्का दिला होता. मात्र आता, जनतेच्या आग्रहामुळे पाटील पुन्हा आपल्या मूळ घरी परतणार आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
या नाट्यमय राजकीय घडामोडींवर अजित पवार गटाचे आमदार अमोल मिटकरी यांनी पाटील यांच्यावर चिमटा काढत, त्यांच्या जुन्या मुलाखतीतील विधानांची आठवण करून दिली आहे. त्या मुलाखतीत पाटील यांनी दलबदल करणाऱ्यांवर टीका करत ‘आयाराम-गयाराम’ संस्कृतीवर कठोर शब्दांत टीका केली होती. मिटकरी यांनी हा व्हिडिओ सोशल मीडियावर शेअर करत व्यंगात्मक पद्धतीने विचारले, “आयाराम की गयाराम?”
पाटील यांच्या या निर्णयामुळे राज्यातील राजकीय वातावरण तापले आहे.