मातृभूमीच्या सेवेची संधी सौभाग्य
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
मातृभूमीच्या सेवेची संधी मिळणे हे मोठे भाग्य आहे. ही सेवा सोपी नाही. मातृभूमीला सर्वस्व मानणाऱ्यांची ही साधना आहे. भारतमातेचे लाडके आणि लाडकींचे हे तप आणि तपस्या आहे, अशा देशप्रेमाने भारलेल्या शब्दांत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी कच्छमधील भारतीय जवानांशी संवाद साधला.
दरवर्षांनुसार पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी यंदाची दिवाळीही भारतीय जवानांसोबत साजरी केली. यावेळी पंतप्रधान गुजरातमधील कच्छमध्ये दाखल झाले. येथे बीएसएफ, सैन्यदल, नेव्ही आणि एअर फोर्सच्या जवानांसोबत त्यांनी संवाद साधला. मिठाई खाऊ घालून त्यांची दिवाळी गोड केली. कच्छच्या खाडी क्षेत्रातील लक्की नाला हे क्षेत्र आव्हानात्मक आणि दुर्गम आहे. दिवस कडक उष्ण आहेत. कडाक्याची थंडी पडते. खाडी परिसरात इतरही पर्यावरणीय आव्हाने आहेत.
जवानांसोबत दिवाळी साजरी करायला मिळणे हा सर्वात मोठा आनंद आहे. मी तुम्हा सर्वांना आणि देशसेवेसाठी तैनात असलेल्या प्रत्येक जवानाला दिवाळीच्या शुभेच्छा देतो. माझ्या या शुभेच्छांमध्ये १४० कोटी भारतीयांचा कृतज्ञता भाव सामावलेला आहे, असे पंतप्रधान मोदी म्हणाले.
भारतात आज स्वतःची सबमरीन तयार केली जात आहे. आमचे तेजस लढाऊ विमान हवाई दलाची
ताकद बनले आहे. पूर्वी शस्त्रास्त्र मागणारा देश अशी भारताची ओळख होती. आज मात्र जगातील अनेक देशांना भारत संरक्षण उपकरणांची निर्यात करत आहे. आम्ही शत्रूच्या बोलण्यावर नव्हे तर आपल्या सैन्याच्या संकल्पावर विश्वास ठेवतो, असे मोदी म्हणाले.
पंतप्रधान मोदी गेल्या ११ वर्षांत दिवाळीत सर्वाधिक चार वेळा जम्मू-काश्मीरला गेले आहेत.
लोहपुरुषाला अभिवादन
पंतप्रधान झाल्यानंतर नरेंद्र मोदी आज प्रथमच गुजरातला
पोहोचले, सरदार वल्लभभाई पटेल यांच्या १४९ व्या जयंती आणि एकता दिनानिमित्त मोदी केवडिया येथे पोहोचले. लोहपुरुष सरदार वल्लभभाई पटेल यांच्या स्मारकस्थळी जाऊन पंतप्रधान मोदी यांनी वल्लभभाईंना आदरांजली वाहिली. समाज माध्यमांवरही मोदींनी सरदार पटेल यांना श्रद्धांजली अर्पण केली. भारतरत्न सरदार वल्लभभाई पटेल यांच्या जयंतीनिमित्त त्यांना माझे शतशः प्रणाम ! राष्ट्राची एकता आणि अखंडतेच्या रक्षणाला त्यांनी सर्वोच्च प्राधान्य दिले. त्यांचे व्यक्तिमत्त्व आणि कार्य देशाच्या प्रत्येक पिढीला प्रेरणादायी ठरेल, असे मोदींनी आपल्या संदेशात म्हटले आहे
तुम्ही दौडता तेव्हा…
तुमची ही अटळ इच्छाशक्ती, तुमचे अथांग शौर्य, पराक्रमाची परिकाष्ठा देश पाहतो तेव्हा त्यातून सुरक्षा आणि शांततेची खात्री देशाला मिळते. जगाला तुमच्या रूपाने भारताची ताकद दिसते. देशाच्या शत्रूना तर त्यांच्या इराद्यांचा शेवट झालेल्याची जाणीव होते. तुम्ही जोशाने धावता तेव्हा दहशतवादी नेते भयकंपित होतात, अशा शब्दांत पंतप्रधान मोदी यांनी जवानांच्या शौर्याचा गौरव केला