नाशिकच्या धार्मिक आणि ऐतिहासिक पर्यटनाला चालना देण्यासाठी केंद्र सरकारने १०० कोटी रुपयांचा विशेष निधी मंजूर केला आहे. या निधीच्या माध्यमातून सीतागुंफा-काळाराम मंदिर ते रामकुंड असा भव्य कॉरिडोर तयार केला जाणार आहे. प्रकल्पाचा उद्देश नाशिकला जागतिक स्तरावर एक आयकॉनिक धार्मिक पर्यटन स्थळ म्हणून विकसित करणे आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Nashik: प्रकल्पाची वैशिष्ट्ये
- पौराणिक देखावे आणि आध्यात्मिक अनुभव:
- रामायणावर आधारित थीम.
- रामकुंडाजवळील पाण्याची स्वच्छता राखण्यासाठी विशेष फिल्टर लावणे.
- राख विसर्जनासाठी स्वतंत्र कुंड उभारणी.
- गांधी तलावाजवळ लेझर शो आणि प्रभू रामांचे शिल्प.
- सुशोभीकरण आणि रस्त्यांचा विकास:
- काळाराम मंदिर, सीतागुंफा आणि आजूबाजूच्या परिसराचा कायापालट.
- धार्मिक वातावरण टिकवून सुसज्ज रस्ते आणि सोयीसुविधा. आर्थिक बाबी
- प्रथम टप्प्यात केंद्र सरकारकडून १०० कोटींचा निधी मिळणार आहे.
- राज्य सरकार उर्वरित ४८ कोटींची आर्थिक मदत करेल.
- एकूण प्रकल्प खर्च: २४८.१८ कोटी रुपये.
नाशिकमध्ये Nashik आगामी सिंहस्थ मेळ्याच्या पार्श्वभूमीवर या प्रकल्पामुळे लाखो भाविकांना सोयीसुविधा मिळतील. धार्मिक स्थळांभोवतीचे आध्यात्मिक वातावरण टिकवून आधुनिक सुविधांचा लाभ देणे हा प्रकल्पाचा उद्देश आहे.
मोदींचे गिफ्ट
भाजप आमदार देवयानी फरांदे यांनी या प्रकल्पाला पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचे गिफ्ट म्हणून संबोधले आहे. या निर्णयामुळे नाशिकचे धार्मिक पर्यटन वाढून स्थानिक अर्थव्यवस्थेला चालना मिळेल, असा विश्वास व्यक्त करण्यात आला आहे.
नाशिक महापालिकेच्या योजनेतून शहराच्या पौराणिक महत्त्वाला नवे रूप देण्यासाठी या प्रकल्पाची अंमलबजावणी लवकरच सुरू होणार आहे.
हे पण वाचा : Simhastha Kumbh Mela 2027 : अंतिम आराखड्यासाठी यंत्रणांना समन्वयाने नियोजनाचे आदेश.