Devendra Fadnavis : राहुल गांधींचे मतदार यादीवर प्रश्न; फडणवीसांचा पलटवार – “महाराष्ट्राचा अपमान नको, आत्मपरीक्षण करा”

Rahul Gandhi Questions Voter List Changes; Fadnavis Hits Back – "Introspect Instead of Insulting Maharashtra"

नवी दिल्ली | ३ फेब्रुवारी २०२५ – लोकसभेतील विरोधी पक्षनेते आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी सोमवारी राष्ट्रपतींच्या अभिभाषणाला उत्तर देताना महाराष्ट्रातील मतदार याद्यांमधील अचानक वाढीबाबत गंभीर प्रश्न उपस्थित केले. त्यांनी ७० लाख नव्या मतदारांची नोंदणी अवघ्या पाच महिन्यांत कशी झाली? असा सवाल केला. यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis)यांनी तीव्र प्रतिक्रिया देत राहुल गांधींना “महाराष्ट्राचा अपमान थांबवा आणि आत्मपरीक्षण करा” असा सल्ला दिला.

राहुल गांधींचे आरोप – महाराष्ट्रातील निवडणूक प्रक्रियेत संशय

राहुल गांधी म्हणाले, “महाराष्ट्रात लोकसभा आणि विधानसभा निवडणुकीतील अवघ्या पाच महिन्यांच्या कालावधीत ७० लाख नवे मतदार कसे वाढले?”” त्यांनी आरोप केला की, ही संख्या हिमाचल प्रदेशच्या एकूण लोकसंख्येइतकी आहे, त्यामुळे निवडणूक प्रक्रियेमध्ये मोठा फेरफार झाल्याचा संशय आहे. “आम्ही केवळ आरोप करत नाही, पण निवडणूक आयोगाने स्पष्टता द्यावी,” अशी मागणीही त्यांनी केली.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

फडणवीसांचा (Devendra fadnavis)पलटवार – “जनादेशाचा अपमान करू नका”

राहुल गांधींच्या वक्तव्यावर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस (Devendra fadnavis)यांनी जोरदार टीका केली. त्यांनी सोशल मीडिया प्लॅटफॉर्म एक्स वर पोस्ट करत म्हटले, “महाराष्ट्राच्या जनतेने एनडीएला लोकशाही मार्गाने कौल दिला. हा अपमान महाराष्ट्राचा आहे. राहुल गांधींनी आत्मपरीक्षण करून महाराष्ट्राच्या जनतेची माफी मागावी.”

फडणवीस पुढे म्हणाले, “छत्रपती शिवाजी महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर, महात्मा फुले आणि वीर सावरकर यांच्या भूमीचा तुम्ही अपमान करत आहात. महाराष्ट्रातील जनता तुम्हाला माफ करणार नाही.”

मतदार यादीतील वाढीवर निवडणूक आयोगाचे स्पष्टीकरण अपेक्षित

राहुल गांधींच्या आरोपांनंतर निवडणूक आयोगाकडून कोणतेही अधिकृत उत्तर आलेले नाही. मात्र, भाजपाच्या नेत्यांनी राहुल गांधींवर टीका करत काँग्रेस पराभवाची कारणे बाहेर शोधत आहे, असा आरोप केला आहे.