Shirdi Murder : शिर्डी येथील साईबाबा संस्थानच्या दोन कर्मचाऱ्यांची मोटारसायकलवरून आलेल्या अनोळखी तरुणांनी धारदार शस्त्राने हत्या केली. तर आणखी एका वृद्ध व्यक्तीवर हल्ला करून त्यांना गंभीर जखमी केलं. सोमवारी पहाटेच्या सुमारास या दोन्ही हल्ल्यांची घटना घडली. पोलिसांनी घटनास्थळावर पोहचून तात्काळ तपास सुरू केला असून, एका संशयिताला ताब्यात घेतले आहे.
मृतांची नावे आणि घटनाचे तपशीलः मृत व्यक्ती सुभाष घोडे आणि नितीन शेजूळ (दोघेही शिर्डी येथील रहिवासी) होते. ते साईबाबा संस्थानमध्ये कामावर जात असताना अनोळखी तरुणांनी त्यांची दुचाकी अडवून धारदार शस्त्राने हल्ला केला. यामध्ये दोघे गंभीर जखमी झाले आणि वेळेत मदत न मिळाल्याने त्यांचा मृत्यू झाला.
तिसरा जखमी कृष्णा देहरकर हे वयोवृद्ध शिर्डी बस स्थानकावरून परत येत असताना त्यांच्यावरही हल्ला करण्यात आला. त्यांना गंभीर जखम झाली असून उपचार सुरू आहेत.
सीसीटीव्हीमध्ये हल्ल्याची छायाचित्रेः गुन्हेगारांनी आपल्या लुटीच्या उद्देशाने जखमींवर हल्ला करून त्यांच्याकडून रक्कम चोरली. या घटनांची सीसीटीव्ही फूटेजमध्ये नोंद झाली आहे, ज्यामुळे पोलिसांनी संशयितांना पकडण्यात यश मिळवले आहे.
पोलिसांची कार्यवाहीः पोलिसांनी किरण सदाफुले यालाताब्यात घेतले असून, राजू माळी या दुसऱ्या संशयिताला शोधत आहेत. घटनास्थळी पोलिसांचे पथक तैनात करण्यात आले असून तपास सुरू आहे.
शिर्डीमध्ये गुन्हेगारी वाढतीचः माजी खासदार डॉ.सुजय विखे यांनी शिर्डीमधील वाढती गुन्हेगारीवर चिंता व्यक्त केली असून, शिर्डीतील गुन्हेगारी नियंत्रणात आणण्यासाठी कठोर पावले उचलण्याची आवश्यकता असल्याचे सांगितले.
शिर्डी व राहाता पोलिसांनी घेतलेली गंभीर कारवाई:
शिर्डी आणि राहाता पोलिसांनी यावर त्वरित कार्यवाही केली असून, गुन्हेगारांना वचक बसवण्यासाठी विविध पथकांची तैनाती केली आहे.