नाशिकः मध्य रेल्वे Railway प्रशासनाने शेतकरी आणि प्रवाशांच्या मागणीनुसार ‘शेतकरी समृद्धी विशेष रेल्वे’ Railway सेवेला विस्तार दिला आहे. देवळाली ते दानापूरदरम्यान धावणारी ही विशेष सेवा 11 जानेवारी पासून 1 फेब्रुवारी 2025 पर्यंत सुरू राहणार आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
गाडी क्रमांक 01153: देवळाली ते दानापूर विशेष रेल्वे प्रत्येक शनिवारी सुटेल.गाडी क्रमांक 01154: दानापूर ते मनमाड विशेष रेल्वे प्रत्येक सोमवारी धावेल.
या गाड्या नाशिक रोड, मनमाड, जळगाव, भुसावळ, बुरहानपूर, खंडवा, इटारसी, जबलपूर, सतना, कटनी, प्रयागराज छिवकी, पं. दीनदयाल उपाध्याय जंक्शन, बक्सर, आणि आरा या स्थानकांवर थांबतील.
रेल्वेमध्ये10 व्हीपी डबे (प्रत्येकाची क्षमता 23 टन) आणि 10 सामान्य द्वितीय श्रेणीचे डबे असतील. या डब्यांच्या माध्यमातून शेतकऱ्यांचे नाशवंत माल जसे की डाळिंब, सीताफळ, द्राक्षे, कांदे, संत्रे, लिंबू, आणि बर्फ मच्छी सुरक्षित आणि वेगाने बाजारपेठांपर्यंत पोहोचवता येतील.
या विशेष रेल्वे सेवेचा मुख्य उद्देश शेतकऱ्यांच्या उत्पादनांना योग्य बाजारपेठांपर्यंत वेळेत पोहोचवून त्यांना चांगले आर्थिक लाभ मिळवून देणे आहे. वेगवान आणि सुरक्षित वाहतुकीमुळे शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पादनांसाठी उत्तम भाव मिळण्याची संधी निर्माण होईल.
मध्य रेल्वे प्रशासनाने शेतकऱ्यांसह प्रवाशांना या सेवेचा लाभ घेण्याचे आवाहन केले आहे,शेतकरी समृद्धी विशेष रेल्वे’ शेतकऱ्यांच्या प्रगतीसाठी एक नवा अध्याय ठरू शकतो.