नाशिक पश्चिममध्ये रंगणार तिरंगी सामना: भाजप, शिवसेना आणि मनसे आमनेसामने

Rangnar tricolor face to face in Nashik West: BJP, Shiv Shiv and MNS face to face

नाशिक: विधानसभेच्या निवडणुकांचे बिगुल वाजल्यानंतर महायुती आणि महाविकास आघाडीत जागा वाटपाच्या चर्चांना वेग आला आहे. अनेक मतदारसंघांमध्ये जागा वाटपाचे समीकरण अजूनही सुटलेले नाही. महायुतीतून आणि आघाडीतूनही अनेक जागांवर रस्सीखेच सुरू आहे. अशा परिस्थितीत नाशिक पश्चिम मतदारसंघाचे चित्र मात्र स्पष्ट झाले आहे. आधी दुरंगी वाटणारी लढत आता तिरंगी झाली आहे.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

भाजपने आपल्या पहिल्या यादीत विद्यमान आमदार सीमा हिरे यांना पुन्हा उमेदवारी दिली आहे. यामध्ये मुख्य लक्षवेधी बाब म्हणजे हिरे यांना पक्षाच्या आतूनच विरोध होऊनदेखील त्यांना उमेदवारी मिळाली आहे. नगरसेवक मुकेश शहाणे यांनी सोशल मीडियावर उघडपणे हिरे यांच्या उमेदवारीचा निषेध केला. तर दुसरे नगरसेवक शशिकांत जाधव यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांची भेट घेतली आहे, तसेच त्यांनी देखील निवडणुकीचा अर्ज घेतला आहे. त्यामुळे जाधव बंडखोरी करतात की पक्ष त्यांची समजूत काढतो, हे पुढील काही दिवसांत स्पष्ट होईल.

याशिवाय, हिरे यांच्या उमेदवारीला जोरदार विरोध करणारे माजी नगरसेवक दिनकर पाटील यांनी लोकसभा निवडणुकीत माघार घेतली होती, पण आता मात्र त्यांनी भाजपविरोधात भूमिका घेत महाराष्ट्र नवनिर्माण सेनेत प्रवेश केला आहे. राज ठाकरे यांच्या उपस्थितीत त्यांनी पक्षात प्रवेश करत पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी मिळवली आहे. त्यामुळे हिरे, पाटील, आणि बडगुजर यांच्यात तिरंगी सामना रंगणार आहे.

महाविकास आघाडीतून शिवसेनेच्या (ठाकरे गट) सुधाकर बडगुजर यांना पश्चिम मतदारसंघातून उमेदवारी देण्यात आली आहे. त्यामुळे आता भाजपच्या सीमा हिरे, महाविकास आघाडीच्या सुधाकर बडगुजर, आणि मनसेच्या दिनकर पाटील यांच्यात थेट सामना होणार आहे.

पश्चिम मतदारसंघातील ही लढत भाजपसाठी अधिक कठीण बनली आहे, कारण पक्षातील इच्छुक असणारे अन्य नेते बंडखोरी करू शकतात. या बंडखोरीची शक्यता वाढत असताना, पक्षातील नेतृत्व या नेत्यांची समजूत काढून त्यांना शांत करण्याचा प्रयत्न करेल की नाही, याबद्दल उत्सुकता आहे.