सोमवार, 23 सप्टेंबर 2024. भाद्रपद कृष्ण षष्ठीराहुकाळ – सकाळी 7:30 ते 9 आज दुपारी २.०० पर्यंत चांगला दिवस आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
(आज जन्मलेल्या बाळाची विष्टी करण शांती करून घेणे)
23 सप्टेंबर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा💐
तुमच्यावर बुध या ग्रहाचा प्रभाव आहे. तुम्ही महत्त्वाकांक्षा असून कायद्याचे पालन करतात. .शांतताप्रिय असता, परंतु सभोवताली बहुवादी मित्र मैत्रिणींचे जाळे असते .तुम्हाला व्यवहारिक वाद्यात मी असे दोन्ही गोष्टींची जोड असते. संगीत, वांग्मय, प्रवासाची आवड असते. पाण्याच्या जवळ तुमचा भाग्य होतो तुम्हाला वरिष्ठानकडून मदत व संरक्षण मिळते .विरुद्ध लिंगी व्यक्तीमध्ये तुम्ही प्रिय होता. तुमच्याजवळ चांगले शब्द संपत्ती असल्याने तुम्ही लिखाणात,बोलण्यात ,भाषण देण्यात किंवा शिकवण्यात तुम्हाला यश मिळते. मोठेपणा, प्रतिष्ठा ,परीक्षा व मान या गोष्टीला अधिक महत्त्व देता. दुसऱ्याची परीक्षा झटकन करायचे ज्ञान तुम्हाला उपजत असते .त्यामुळे तुम्ही अत्यंत बुद्धिवान, धूर्त, जलद काम करणारे आणि व्यापारी वृत्तीचे आहात. तुम्हाला अंतर्गत आवाजाची देणगी आहे. तुम्ही उदार आणि विशाल मनाचे असून इतरांचा आदर आणि कदर करतात. तुम्ही एक उत्तम कलाकार आहात. आणि कलाप्रिय आहात. तुमचे व्यक्तिमत्व चटपटीत आणि प्रसन्न आहे. तुमचे बोलणे आणि दिसणे आकर्षक आहे. तुमच्यात समजूतदार पण असतो. स्वतःचे विचार मित्रांना समजून सांगण्याची हौस असते. तुमचे उद्दिष्ट काय आहे ते तुम्हाला माहीत असतं आणि त्यासाठी तुम्ही सतत प्रयत्न करत असतात. अत्यंत उच्च प्रतीचे कपडे, दागिने, सुगंधी द्रव्य याचे तुम्हाला आकर्षण असते. समाजाच्या सर्व थरात मिसळणे आणि समारंभांमध्ये भाग घेणे तुम्हाला आवडते. तुमचा दृष्टिकोन विशाल असून जीवनाकडे तुम्ही संयमाने बघतात. इतरांना तुम्ही सतत मदत करत असतात. तुम्हाला धर्म आणि तत्वज्ञान यांची विशेष आवड आहे तसेच प्रवास करणे आवडते.तुम्हाला आरामशीर आयुष्याची आवड असते .घरात व बाहेर दोन्ही ठिकाणी तुम्ही रमता. उत्कृष्ट गृहिणी व गृहकृत्यदक्ष असता. पतीशी जुळवून घेण्यात तरबेज असता. तुम्ही आरोग्याने सुदृढ असून, रूढी बद्दल आयुष्य तुम्हाला आवडत नाही. स्वभावाने नम्र असतात. पतीच्या व्यवसायात रस घेऊन त्याला मदत करण्याकडे कल असतो. घरातली टापटीप,व्यवस्थित पणा ठेवणायची कामे दुसऱ्यांकडून करून घेण्यात वाकबगार असता.वाचनाची आवड असून वक्तृत्व ,ज्ञान ,बौद्धिक बैठक आहे ,कला, प्रवास यांचे आवड आहे ,अशा लोकांकडे जाणे येणे तुम्हाला आवडते.
शुभ दिवस:- बुधवार, शुक्रवार, शनिवार.शुभ रंग:- पांढरा आणि हिरवा.
शुभ रत्न:- पाचू आणि हिरा.(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
*आजचे राशीभविष्य*
मेष:- मैत्रिणींनो आज कौटुंबिक सौख्य लाभेल. कामात वाढ होईल.धनप्राप्ती होईल.
वृषभ:-मैत्रिणींनो आज चांगला दिवस आहे. आर्थिक लाभाचा. आत्मविश्वास वाढेल. मेजवानीचा लाभ होईल.
मिथुन:- मैत्रिणींनो आज संमिश्र दिवस आहे. व्यय स्थानी चंद्र आहे. अध्यात्मात मन रमेल. दानधर्म कराल.
कर्क:-मैत्रिणींनो आज लाभ स्थानी चंद्र आहे. मनासारखी शॉपिंग होईल. अनपेक्षित लाभ होतील. मन आनंदी राहील.
सिंह:- मैत्रिणींनो आज आर्थिक लाभ होतील. कामात उत्तम सहकार्य मिळेल.
कन्या:- मैत्रिणींनो आज पूर्वजांची पुण्याई कामास येईल. प्रवास चे योग. आरोग्य जपा.
तुळ:- मैत्रिणींनो आज अष्टम स्थानी चंद्र आहे. ज्योतिष ,गुढविज्ञान यात रस निर्माण होईल. मात्र नैतिकता सोडू नये.
वृश्चिक:- मैत्रिणींनो आज मैत्र मंडळी मदत करतील. पतीची साथ मिळेल. आवडत्या व्यक्ती भेटतील.
धनु:- मैत्रिणींनो आज सहकारी मदत करतील . मन प्रसन्न राहील. आर्थिक भरभराट होईल.
मकर:- मैत्रिणींनो आज प्रगती होईल, उत्साह वाढेल. संततीकडून खूष खबर मिळेल.
कुंभ:- मैत्रिणींनो आज काळजीपूर्वक वागा, घरगुती कामे आज पूर्ण होतील.कागदपत्रे नीट तपासून पहा. कामाचे नियोजन चुकू शकेल.
मीन:- मैत्रिणींनो आज उत्तम लाभ होतील. कामे मार्गी लागल्याने उत्साह वाढेल. छोटे प्रवास घडतील.
*सौ मधुरा मंगेश पंचाक्षरी* नाशिक ..मोब – 9272311600 लग्न ,करिअर, विवाह गुण मिलन विषयी सशुल्क पत्रिका पाहण्यासाठी संपर्क करावा.