दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
बुधवार, 11 सप्टेंबर 2024*. भाद्रपद शुक्ल अष्टमी
राहू काळ – दुपारी 12 ते 1:30
आज आनंदी दिवस आहे” गौरी पूजन दुर्गाष्टमी.
(आज जन्मलेल्या बाळाची विष्टी करण शांती करून घ्यावी)
11 सप्टेंबर रोजी जन्मलेल्या महिलांची वैशिष्ट्ये आणि त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा 💐
तुमच्यावर चंद्र आणि बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. जीवनाविषयी आणि प्रेमाविषयी तुमचा भावनिक आणि काहीसा स्वार्थी दृष्टीकोन असतो. तुम्ही ध्येयवादी आहात आणि तुमच्या मध्ये प्रचंड कल्पनाशक्ती आहे. तुमचा स्वभाव स्वप्नाळू आहे. तुम्ही अतिशय हळवे असून लवकर अस्वस्थ होतात. इतरांनी तयार केलेल्या आराखड्याचे तुम्ही प्रत्यक्षात रूपांतर करू शकतात. तुम्हाला कोडे सोडवण्याचा छंद असतो. तुम्ही कष्टाळू आणि शांत असतात, मात्र तडजोड करत नाहीत. विनाकारण काळजी करण्याचा स्वभाव असून मन कष्टी असते. भाषणे, लेखन आणि श्रुतिका लिहिणे तुम्हा आवडते. तुमचे विचार स्वतंत्र आहेत. तुम्हाला मानसन्मान मनापासून आवडतात. तुम्ही समाजामध्ये मिसळतात. कोणत्याही गोष्टीतील नावीन्य आणि प्रवासाची तुम्हाला आवड आहे. तुम्ही हुशार आहात आणि शास्त्राची आवड आहे. तुमचा सहवास इतरांना उत्साहवर्धक वाटतो. मित्रांच्या सुखदुःखाचा तुम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करतात. तुम्हाला बरे आणि वाईट नीटपणे समजते. नवनवीन कल्पना आणि भरपूर उत्साह यांचा संगम झाल्याने तुम्ही मोठमोठ्या प्रकल्पात काम करू शकतात. तुम्हाला स्वतःच्या उद्योगात मग्न राहणे आवडते. तुमचा स्वभाव विनम्र असून तुम्ही कायदा प्रेमी आहात. तुम्ही अधिक वयस्कर माणसांकडे आकर्षित होतात. वयाच्या 38 व्या वर्षानंतर आर्थिक स्थितीत समाधानकारक बदल होतात. खर्चिक स्वभावापासून प्रिय व्यक्तीसाठी खर्च करण्यास मागेपुढे पाहत नाहीत. उत्कृष्ट गृहिणी असून गृहकृत्यदक्ष असतात हुशार ,हरहुन्नरी आणि कर्तुत्ववान असून पतीशी जुळवून घेतात .समाज प्रियतेमुळे घरी येणारे जाणारे बरेच असतात. घरात व बाहेर दोन्ही ठिकाणी तुम्ही रमता. वैवाहिक जीवनात येणाऱ्या अडचणींना यशस्वी तोंड देता. विनोदी स्वभाव व वाकचतुर्य असल्याने सामाजिक जीवनात यशस्वी होता .तुम्हाला स्वतःच्या दिसण्याचा, व्यक्तिमत्त्वाचा व घराचा अभिमान असून तुमच्या वागण्यामुळे इतरांना मत्सर वाटतो.
शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, शुक्रवार.
शुभ रंग:– पांढरा, निळा, पिवळा.
शुभ रत्न:– मोती आणि हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
आजचे राशिभविष्य
मेष:-मैत्रिणींनो आज प्रतिकूल दिवस.महत्वाची कामे पुढे ढकला .रुटीन चालू ठेवा.दूरच्या प्रवासाचे योग.
वृषभ:-मैत्रिणींनो आज धोकादायक गोष्टी टाळा. सार्वजनिक ठिकाणी उगाच प्रसिद्धीच्या मागे लागू नका. शत्रू वाढतील. वाहन चालवताना सावधान रहा.मात्र काहींना अचानक लाभ होऊ शकतो.
मिथुन:- मैत्रिणींनो आज मौल्यवान वस्तू सांभाळा.पित्ताचा त्रास होऊ शकतो. हाताची काळजी घ्या. नाती सांभाळा.
कर्क:-मैत्रिणींनो आज जस आहे तसेच चालू ठेवा. बोलताना काळजी घ्या.प्रकृतीच्या तक्रारीकडे दुर्लक्ष नको. दत्त गुरूंची उपासना करा. दानधर्म कराल.
सिंह:- मैत्रिणींनो आज आनंदी दिवस आहे.मैत्र परिवाराचा सहवास मिळेल.भेटवस्तू मिळतील. जुन्या गोष्टीना उजाळा मिळेल.आनंद दायक बातम्या समजतील. घरात व्यस्त रहाल..
कन्या:– मैत्रिणींनो आज आर्थिक दृष्टीने चांगला दिवस आहे. आत्मविश्वास वाढेल.एखादी टिप्पणी कीर्ती मिळवून देईल. नवीन खरेदी होईल. प्रवास आनंद देणारा ठरेल.
तुळ:-मैत्रिणींनो आज पैशाची चिंता मिटेल.वाद होईल असे बोलणे टाळा. वाहन सावधतेने चालवा.आध्यत्मिक लाभ होतील.
वृश्चिक:-मैत्रिणींनो आज गोड बोलून कामे होऊ शकतात.विवाह इच्छुकांना छान बातमी मिळेल
पतीची मर्जी सांभाळावी लागेल.
धनु:-मैत्रिणींनो आज उदार वृत्तीने वागाल.नोकरीत नवीन साधी चालून येतील. आरोग्य जपा. विनाकारण शत्रुत्व ओढवून घेऊ नका.
मकर:- मैत्रिणींनो आज मन आनंदी राहील.लाभ होतील. कष्टाचे उत्तम फळ मिळेल. हाडांचे विकार होऊ शकतात. काळजी घ्या.आहाराची पथ्ये पाळा.
कुंभ:-मैत्रिणींनो आज कामात व्यस्त रहाल. पतिची नाराजी दूर करावी लागेल. आवडत्या व्यक्ती शी भेट घडेल.आर्थिक आघाडी उत्तम राहील.
मीन:- मैत्रिणींनो आज भाग्यवर्धक घटना अनुभवास देईन. योग्य मार्गदर्शन मिळेल.मेहनत जास्त होईल त्या मानाने लाभ कमी राहील. आरोग्य जपा.
सौ मधुरा मंगेश पंचाक्षरी नाशिक
9272311600
लग्न ,करियर, गुण मीलन विषयी
सशुल्क पत्रिका पाहण्यासाठी संपर्क करावा.