दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
तुमच्यावर चंद्र आणि बुध या ग्रहांचा प्रभाव आहे. जीवनाविषयी आणि प्रेमाविषयी तुमचा भावनिक आणि काहीसा स्वार्थी दृष्टीकोन असतो. तुम्ही ध्येयवादी आहात आणि तुमच्या मध्ये प्रचंड कल्पनाशक्ती आहे. तुमचा स्वभाव स्वप्नाळू आहे. तुम्ही अतिशय हळवे असून लवकर अस्वस्थ होतात. इतरांनी तयार केलेल्या आराखड्याचे तुम्ही प्रत्यक्षात रूपांतर करू शकतात. तुम्हाला जुगार किंवा कोडे सोडवण्याचा छंद असतो. तुम्ही कष्टाळू पाहणी शांत असतात मात्र तडजोड करत नाहीत. विनाकारण काळजी करण्याचा स्वभाव असून मन कष्टी असते. भाषणे, लेखन आणि श्रुतिका लिहिणे तुम्हा आवडते. तुमचे विचार स्वतंत्र आहेत. तुम्हाला मानसन्मान मनापासून आवडतात. तुम्ही समाजामध्ये मिसळतात. कोणत्याही गोष्टीतील नावीन्य आणि प्रवासाची तुम्हाला आवड आहे. तुम्ही हुशार आहात आणि शास्त्राची आवड आहे. तुमचा सहवास इतरांना उत्साहवर्धक वाटतो. मित्रांच्या सुखदुःखाचा तुम्ही सहानुभूतीपूर्वक विचार करतात. तुम्हाला बरे आणि वाईट नीटपणे समजते. नवनवीन कल्पना आणि भरपूर उत्साह यांचा संगम झाल्याने तुम्ही मोठमोठ्या प्रकल्पात काम करू शकतात. तुम्हाला स्वतःच्या उद्योगात मग्न राहणे आवडते. तुमचा स्वभाव विनम्र असून तुम्ही कायदा प्रेमी आहात. तुम्ही अधिक वयस्कर माणसांकडे आकर्षित होतात.
व्यवसाय:- लेखक, वक्ता, पुढारी, डॉक्टर, केमिस्ट, बँकिंग, वकील, चार्टर्ड अकाउंटंट, सचिव.
शुभ दिवस:- सोमवार, मंगळवार, शुक्रवार.
शुभ रंग:– पांढरा, निळा, पिवळा.
शुभ रत्न:- मोती आणि हिरा.
(रत्ने घेताना कुंडलीचा देखील उपयोग करा)
बुधवार, ११ सप्टेंबर २०२४. भाद्रपद शुक्ल ज्येष्ठ/मूळ. राशिभविष्य –
राहुकाळ – दुपारी १२.०० ते दुपारी १.३०
“आज आनंदी दिवस आहे” गौरी पूजन दुर्गाष्टमी.
नक्षत्र – ज्येष्ठ/मूळ. आज जन्मलेल्या बाळाची राशी – वृश्चिक/ (रात्री ९.२२ नंतर) धनु. (विष्टी करण शांती करून घ्यावी)
मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा गुरू शी प्रति योग आणि सूर्याशी केंद्र योग आहे. फारशी अनुकूलता नाही. सांभाळून पावले टाका. मोठे करार आज नकोत.
वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) सामाजिक कार्य करताना काळजी घ्या. विनाकारण प्रसिद्धीच्या मागे लागू नका. शत्रू वाढतील. राजकारणात प्रगती नाही.
मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आर्थिक लाभ होतील. मात्र मोठी जोखीम नको. मौल्यवान वस्तू सांभाळा. हाताची काळजी घ्या. नाती सांभाळा.
कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) फारसे धाडसी निर्णय घेऊ नका. बोलताना काळजी घ्या. शेअर्स मध्ये जोखीम नको. दत्त गुरूंची उपासना करा. दानधर्म कराल.
सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) आज आनंदी दिवस आहे. भेटवस्तू मिळतील. आनंद देणाऱ्या बातम्या समजतील. घरगुती कामे पूर्ण करावी लागतील.
कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) आर्थिक दृष्टीने चांगला दिवस आहे. काही सुखद अनुभव येतील. नवीन खरेदी होईल. प्रवासात काही सुखद अनुभव येतील.
तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) अनुकूल ग्रहमान आहे. कर्ज मंजूर होईल. सरकारी कामे रेंगाळतील. आध्यत्मिक लाभ होतील. पैशांची व्यवस्था होईल.
वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) नेहमीच ताठर भूमिका घेऊन चालत नाही. आज गोड बोलून कामे होऊ शकतात. नोकरीत वरिष्ठ नाराज होऊ शकतात.
धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) आज फारशी अनुकूलता नाही. औदार्य दाखवाल. महिलां सहकारी कडून कामे करताना तारतम्य बाळगावे लागेल.
मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) अनुकूल दिवस आहे. मन आनंदी राहील. कष्टाचे उत्तम फळ मिळेल. हाडांचे विकार होऊ शकतात. काळजी घ्या.
कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) सरकारी कामात दिरंगाई होऊ शकते. पत्नीची नाराजी दूर करावी लागेल. घर आणि व्यवसाय यात ओढाताण होईल.
मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) नववा चंद्र काही सुखद घटना अनुभवास देईन. आर्थिक बळ वाढेल. आध्यत्मिक लाभ होतील. आरोग्याची काळजी घ्या.
व्यवसाय, भागीदार, मित्र, जोडीदार, या तारखेला जन्मलेली व्यक्ती पती किंवा पत्नी म्हणून कशी असेल तसेच तुमचा स्वभाव, भाग्योदय, आजार, तुमची शक्तीस्थाने, कमतरता, शुभ रत्ने इत्यादी माहिती अगदी अल्प किमतीत जाणून घ्या
कुंडली परीक्षण करण्यासाठी कृपया संपर्क करा. – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521