Rashibhavishya: आजचे राशिभविष्य

राहू काळ - सकाळी ७.३० ते सकाळी ९.००

सोमवार, १४ ऑक्टोबर २०२४. अश्विन शुक्ल एकादशी/द्वादशी. शरद ऋतू.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

राहू काळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००

“आज क्षय तिथी आहे.” भागवत एकादशी

चंद्र नक्षत्र – शततारका. आज जन्मलेल्या बाळाची राशी – कुंभ. (विष्टी करण शांती करून घेणे)

मेष:- सूर्याचा मंगळाशी केंद्र योग आहे. अति धाडस नको. प्रापंचिक सुख मिळेल. संततीशी सुसंवाद साधाल. गुंतवणूक करताना काळजी घ्या.

वृषभ:- सामाजिक कार्यात भाग घ्याल. प्रसंगी कठोर बोलावे लागेल. शब्दास मान द्यावा. कामाचा जोर वाढेल.

मिथुन:- नवम स्थानी चंद्र आहे. पुण्याई मदत करेल. पराक्रम गाजवाल. दबदबा वाढेल. सिद्धी प्राप्त होतील.

कर्क:- अनुकूलता नाही. अष्टम स्थानी चंद्र – शनी युती आहे. मोठी जोखीम घेऊ नका. वादविवाद टाळा. प्रेमात अपयश संभवते.

सिंह:- आत्मविश्वास भरपूर वाढलेला आहे. कष्ट केल्यास यश मिळेल. वादविवाद टाळा. पत्नीचा सल्ला मोलाचा ठरेल.

कन्या:- आर्थिक लाभ होतील. कामाचा व्याप वाढेल. विनाकारण त्रास होईल. खर्च वाढतील. आरोग्य सांभाळा.

तुळ:- पंचम स्थानी चंद्र आहे. सुखद अनुभव येतील. उत्साह वाढेल. संतती बाबत चांगली बातमी समजेल. शेअर्स मध्ये गुंतवणूक नको.

वृश्चिक:- मौल्यवान खरेदी होईल. कामाचा पसारा वाढेल. ऐनवेळी नवीन जबाबदारी येऊन पडेल. जमिनीची कामे मात्र लांबणीवर पडतील.

धनु:- काही विशेष घटना घडतील. नवीन संधी चालून येतील. प्रवास होतील. मौल्यवान खरेदी होईल. चैन कराल.

मकर:-संमिश्र कालावधी आहे. आध्यत्मिक लाभ होतील. विनाकारण वादात पडू नका. कुटुंबास वेळ द्या.

कुंभ:- तुमच्याच राशीत चंद्र आहे. भेटवस्तू मिळतील. येणी वसूल होतील. आत्ममग्न व्हाल. नवीन मार्ग सापडतील.

मीन:- संमिश्र दिवस आहे. व्यवसायात लाभ होतील. आर्थिक स्थिती सुधारेल. मात्र देणी द्यावीच लागतील. दानधर्म करावा.

  • ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521

Leave a Reply