१२ एप्रिल २०२५ – चैत्र पौर्णिमा विशेष: हनुमान जयंती व राशिभविष्य कथा | ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Rashibhavishya: आजचा दिवस – शनिवार, १२ एप्रिल २०२५. चैत्र महिन्यातील पौर्णिमा, आणि विशेष म्हणजे हनुमान जयंती! आजपासून वैशाख स्नान सुरू होत आहे. संध्याकाळी ५ नंतरचा वेळ शुभ मानला जातो. हस्त नक्षत्रातून चित्रा नक्षत्रात संक्रमण – असा चंद्राचा प्रवास आहे. कन्या राशीतील बाळ जन्माला येण्याची शक्यता.
राहुकाळ: सकाळी ९.०० ते १०.३०. यावेळी महत्त्वाची कामे टाळावीत.
आता पाहूया राशींचे कथारूपात आजचे भविष्य…
Rashibhavishya
मेष – ‘कराराच्या वाटेवर’
चंद्र-गुरु त्रिकोण आणि सूर्याशी विरोध यामुळे संघर्षातून यश. जुने आर्थिक प्रश्न सुटतील. कायदेशीर मार्गाने सावध राहा.
वृषभ – ‘संधीची चाहूल’
व्यवसाय आणि नोकरीत अनपेक्षित फायदा. घरात शुभवार्ता. संततीबाबत हर्षभर बातमी. आनंदाचे क्षण.
मिथुन – ‘श्रमाचे सोनं’
आजचा दिवस मेहनतीला पुरस्कृत करणारा. जमिनीशी संबंधित लाभ. वाणी प्रभावी. दानधर्मातून समाधान.
कर्क – ‘मनासारखं आभाळ’
उद्योगात यश. स्वप्न प्रत्यक्षात. गुरूची साथ. सर्व काही आपल्या बाजूने.
सिंह – ‘अडथळ्यांची फुलं’
काही तांत्रिक अडचणी येतील पण देवकृपेने मार्ग मोकळा होईल. प्रशासकीय कामे थोडी रखडू शकतात.
कन्या – ‘गुप्त शत्रूंची सावली’
व्यवसायात भरभराट. स्वतःवर खर्च. परंतु काही अपरीक्षित अडचणी – सावध राहा.
तुळ – ‘संशयाचा कुहू’
ग्रहस्थिती मिश्र. मन चंचल राहील. खर्च वाढेल. गुंतवणुकीत जोखीम नको.
वृश्चिक – ‘मोकळा श्वास’
ग्रहमान अनुकूल. जुनी कामे पूर्णत्वास जातील. मान-सन्मान मिळेल, पण बोलताना संयम हवा.
धनु – ‘संधी आणि श्रम’
नोकरीत बढती/बदली. वरिष्ठांचा पाठिंबा. श्रमाचे फळ मिळेल. शेती कामे थोडी लांबतील.
मकर – ‘प्रवास आणि खरेदी’
आज शुभ दिवस. प्रवास योग. विदेश गमन शक्यता. काहीतरी मौल्यवान खरेदी केली जाईल.
कुंभ – ‘गोंधळलेली वाट’
चंद्र अष्टमात. अनुकूलता कमी. कामे रखडतील. पण चंद्र-गुरुयोग सुखद अनुभवही देईल.
मीन – ‘सौंदर्य आणि संभ्रम’
शुक्राचा वरदहस्त. नात्यांमधून सहकार्य. भौतिक आनंद. परंतु मन काही वेळा गोंधळेल.
टीप: नावावरून राशी ठरतातच असे नाही. आपल्या खरी जन्मतारीख-वेळ-ठिकाणावर आधारित खरी राशी जाणून घ्या.
– ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक | संपर्क: 8087520521