Rashibhavishya: २० जानेवारी २०२५ – राशीभविष्य: यशस्वी निर्णयांचा दिवस!

Today Rashibhavishya

Rashibhavishya सोमवार, २० जानेवारी २०२५. पौष कृष्ण षष्ठी/सप्तमी. क्रोधीनाम संवत्सर.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

राहुकाळ – सकाळी ७.३० ते सकाळी ९.००

आज सकाळी १०.०० पर्यंत चांगला दिवस आहे.

चंद्रनक्षत्र – हस्त/(रात्री ८.३० नंतर) चित्रा. आज जन्मलेल्या बाळाची राशी – कन्या. (विष्टी करण शांती)

टीप: नावाप्रमाणेच तुमच्या राशी असतील असे नाही

मेष:-(चू,चे,चो,ला,ली,ले,लो,आ) चंद्राचा गुरुशी त्रिकोण योग, तर बुधाशी केंद्र योग आहे. अनुकूल ग्रहमान आहे. आज फायद्याचे करार होतील. नोकरीच्या ठिकाणी कायदेशीर लाभ होतील.

वृषभ:- (इ,उ,ए,ओ, वा,वी,वू,वे,वो) व्यवसाय वाढेल. नोकरीत मनासारख्या घटना घडतील. अचानक लाभ होतील. शेअर्स/लॉटरी यात नशीब अजमावून बघा.

मिथुन:- (का,की,कु,घ,गं, छा,के,को,हा) आध्यत्मिक लाभ होतील. दान धर्म कराल. वक्तृत्व चमकेल. सामाजिक कार्यात चमक दाखवाल.

कर्क:-(हु,हे,हो,डा,डी,डु,डे, डो) दिवसाची सुरुवात चांगली होणार आहे. मनासारखी कामे पार पडतील. अनुकूल गुरू स्वप्ने साकार करतील.

सिंह:- (मा,मी,मू,मे,मो,टा, टी, टू, टे) उत्तम सुरुवात आहे. अडचणी दूर होतील. कुलदेवतेची कृपा राहील. चांगले अनुभव येतील.

कन्या:- (टो, पा,पी,पू,षा णा,ठा,पे,पो) व्यवसायासाठी अनुकूल ग्रहमान आहे. खरेदी होईल. पशूंपासून सावध रहा. स्वतःसाठी खर्च कराल.

तुळ:-(रा,री,रु,रे,तो,ता,ती,तू,ते) संमिश्र ग्रहमान आहे. मन साशंक राहील. प्रिय व्यक्तीची भेट होईल. चैनीवर खर्च कराल.

वृश्चिक:- (तो,ना,नी,नू, ने,नो,या,यी,यु) अत्यंत अनुकूल ग्रहमान आहे. आज सगळी रखडलेली कामे पूर्ण करा. बोलताना कळजी घ्या.

धनु:-(ये,यो,भा,भी,भु,धा,फा,ढा,भे) नोकरीत बढती/बदली होईल. वरिष्ठांकडून लाभ होतील. मेहनत केल्यास उत्तम यश मिळेल.

मकर:- (भो,जा,जी,खी, खु,खे,खो,गा,गी) शुभ दिवस आहे. भ्रमंती घडेल. परदेश गमनाचे योग आहेत. मौल्यवान खरेदी होईल.

कुंभ:- (गु,गे,गो,सा, सी,सु,से,सो,दा) अष्टम स्थानी चंद्र आहे. फारशी अनुकुलता नाही. कामे रेंगाळतील. विनाकारण कटकटी होऊ शकतात.

मीन:- (दी, दू, झा,ज्ञा,था, दे,दो, चा,ची) आजचा दिवस प्रिय व्यक्तीसोबत व्यतीत कराल. मन आनंदी राहील. नात्यातून सहकार्य मिळेल.

-सायन ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक. 8087520521.