ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक – 8087520521
रथसप्तमी | जागतिक सूर्यनमस्कार दिवस
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
- दिनांक: मंगळवार, ४ फेब्रुवारी २०२५
- तिथी: माघ शुक्ल सप्तमी
- चंद्र नक्षत्र: अश्विनी
- राहुकाळ: दुपारी ३.०० ते ४.३०
आज जन्मलेल्या बाळाची राशी: मेष
आजचे राशीभविष्य (Rashibhavishya )
मेष (Aries) (चू, चे, चो, ला, ली, ले, लो, आ)
चंद्राचा प्लूटोशी केंद्र योग आहे. अनुकूल शनी तुम्हाला नवीन संधी देईल. स्वप्ने पूर्ण होतील. सखोल ज्ञान मिळवाल.
वृषभ (Taurus) (इ, उ, ए, ओ, वा, वी, वू, वे, वो)
संमिश्र दिवस आहे. व्यय स्थानी चंद्र असल्याने खर्च वाढण्याची शक्यता आहे. प्रलोभने टाळा.
मिथुन (Gemini) (का, की, कु, घ, गं, छा, के, को, हा)
अनुकूल दिवस आहे. नोकरीतील अनुभवाचा फायदा होईल. नवीन संधी मिळतील. मित्रमंडळी भेटतील.
कर्क (Cancer) (हु, हे, हो, डा, डी, डु, डे, डो)
दशमस्थ चंद्रामुळे कामाचा ताण वाढेल. नोकरीत चांगले अनुभव येतील. अधिकाराचा गैरवापर टाळा.
सिंह (Leo) (मा, मी, मू, मे, मो, टा, टी, टू, टे)
दूरचे प्रवास होतील. मन आनंदी राहील. अडचणी दूर होतील. धार्मिक खर्च वाढतील.
कन्या (Virgo) (टो, पा, पी, पू, षा, णा, ठा, पे, पो)
संमिश्र ग्रहमान आहे. काही बाबतीत प्रतिकूलता जाणवेल. गरजूना मदत करा. आरोग्य सांभाळा.
तुळ (Libra) (रा, री, रु, रे, तो, ता, ती, तू, ते)
महत्वाची कामे पूर्ण करण्यासाठी आजचा दिवस उत्तम आहे. मोठ्या गुंतवणुकीपासून दूर राहा.
वृश्चिक (Scorpio) (तो, ना, नी, नू, ने, नो, या, यी, यु)
आर्थिक प्रगती होईल. अडथळे दूर होतील. व्यावसायिक बदल संभवतो. प्रवासाचे नियोजन बदलेल.
धनु (Sagittarius) (ये, यो, भा, भी, भु, धा, फा, ढा, भे)
अनुकूल ग्रहमान आहे. अचानक धनलाभ होऊ शकतो. शेअर्समध्ये यश मिळेल.
मकर (Capricorn) (भो, जा, जी, खी, खु, खे, खो, गा, गी)
मन उत्साही राहील. घरगुती कामाला प्राधान्य द्याल. संपत्ती वाढेल, परंतु न्यायालयीन प्रकरणात यश मिळणे कठीण.
कुंभ (Aquarius) (गु, गे, गो, सा, सी, सु, से, सो, दा)
मन आनंदी राहील. सौख्य लाभेल. व्यवसाय वाढेल. आर्थिक स्थिती सुधारेल.
मीन (Pisces) (दी, दू, झा, ज्ञा, था, दे, दो, चा, ची)
अनुकूल दिवस आहे. दिवसभर महत्त्वाची कामे पूर्ण करा. आर्थिक लाभ होतील. संततीची चिंता राहील.
४ फेब्रुवारी रोजी जन्मलेल्या व्यक्तींची वैशिष्ट्ये
1. तुम्ही प्रामाणिक, संगीतप्रेमी, कलाप्रेमी आणि तर्कशुद्ध विचार करणारे आहात.
2. प्रतिष्ठा आणि सभ्यपणा तुम्हाला प्रिय आहे.
3. संशोधन आणि सूक्ष्म निरीक्षण करण्याची सवय आहे.
4. तुम्हाला सतत प्रगती करणे आवडते.
5. कुटुंबाबद्दल प्रचंड प्रेम आहे, परंतु ढोंगी लोकांची चीड येते.
6. हर्षल ग्रहाच्या प्रभावामुळे अकल्पित घटना अनुभवण्याची शक्यता आहे.
व्यवसाय क्षेत्र:
- विद्युत क्षेत्र
- दळणवळण
- इंजिनिअरिंग
- तंत्रज्ञान
- बँकिंग
आरोग्य:
गुडघे, पाय दुखणे, दमा आणि संसर्गजन्य रोगांपासून सावध राहा.
शुभ गोष्टी:
- शुभ दिवस: सोमवार, शुक्रवार, शनिवार
- शुभ रंग: पांढरा, जांभळा, राखाडी
- शुभ रत्ने: हिरा, मोती, पुष्कराज (रत्ने वापरण्यापूर्वी कुंडली विश्लेषण आवश्यक)
तुमच्या कुंडलीचा सविस्तर अभ्यास करून भविष्य जाणून घ्या!
कुंडली परीक्षण व सल्ल्यासाठी संपर्क करा – ज्योतिषी मंगेश पंचाक्षरी, नाशिक
8087520521