नवी दिल्ली, 18 सप्टेंबर 2024: भारताच्या राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनी गणेश चतुर्थीच्या पवित्र सणानिमित्त देशातील आणि परदेशातील सर्व भारतीयांना हार्दिक शुभेच्छा दिल्या आहेत. आपल्या संदेशात राष्ट्रपती मुर्मू म्हणाल्या की, “गणेश चतुर्थीचा हा आनंददायी सण सामाजिक सलोखा, एकात्मता आणि बंधुभावाचा संदेश देतो. भगवान गणेश हे ज्ञान, बुद्धी आणि समृद्धीचे प्रतीक आहेत, जे आपल्याला नम्रता आणि कर्तव्यनिष्ठेची प्रेरणा देतात.”
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
राष्ट्रपतींनी या सणाच्या निमित्ताने देशवासीयांनी शांतता, सामाजिक एकात्मता आणि समृद्धीचा संदेश देत, शांततापूर्ण आणि प्रगत भारत निर्माण करण्याचा संकल्प करण्याचे आवाहन केले आहे.
भगवान गणेशाच्या आशीर्वादाने देशात आनंद, सौहार्द आणि प्रगतीचे वातावरण वाढावे, अशी सदिच्छा देखील त्यांनी व्यक्त केली आहे.