नाशिक | Nashik News Update | Ration Shops: राज्यातील सार्वजनिक वितरण व्यवस्थेअंतर्गत (PDS) अन्नधान्य वितरित करणाऱ्या रास्त भाव दुकानधारकांच्या मार्जिन दरात 20 रुपयांची वाढ करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय मंत्रिमंडळ बैठकीत घेण्यात आला. मात्र दुकानदारांच्या मागणीच्या तुलनेत ही वाढ कमी असल्याने असंतोष व्यक्त होत आहे.
मंत्रिमंडळाचा निर्णय
राज्याचे अन्न व नागरी पुरवठा मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले की, राष्ट्रीय अन्नसुरक्षा योजनेतील (NFSA) पात्र लाभार्थी – अंत्योदय अन्न योजना व प्राधान्य कुटुंब – यांना ई-पॉस मशीनद्वारे अन्नधान्य वितरण करणाऱ्या रास्त भाव दुकानदारांच्या प्रतिक्विंटल मार्जिन दरात 150 रुपयांवरून 170 रुपये करण्यात आले आहे.
या निर्णयामुळे राज्याच्या तिजोरीवर अंदाजे ₹ 92.71 कोटींचा अतिरिक्त वार्षिक आर्थिक भार येणार आहे.
दुकानदारांची भूमिका – वाढ अपुरी
- रेशन दुकानदार संघटनेने ५० रुपयांची वाढ मागितली होती.
- त्याऐवजी केवळ 20 रुपयांची वाढ जाहीर झाली.
- दुकानदारांचे म्हणणे आहे की, प्रतिक्विंटल मार्जिन 200 रुपये करणे आवश्यक आहे.
“महामाईच्या किमती व खर्च लक्षात घेत ही वाढ तुटपुंजी आहे,” असे दुकानदारांनी स्पष्ट केले.
पार्श्वभूमी (Ration Shops)
राज्यातील PDS प्रणालीत लाखो शिधापत्रिकाधारकांना दरमहा अन्नधान्य वितरित करण्याचे काम रास्त भाव दुकानांद्वारे केले जाते. ई-पॉस मशीन, वाहतूक, मजुरी, आणि देखभाल खर्च वाढल्याने दुकानदारांकडून मार्जिन वाढीची मागणी सातत्याने केली जात होती.