२७ वर्षांनंतर दिल्लीमध्ये भाजपची सत्ता (Rekha Gupta)
दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदी आता रेखा गुप्ता (Rekha Gupta) विराजमान झाल्या आहेत. जवळपास २७ वर्षांनंतर दिल्लीमध्ये भाजपने सत्ता स्थापन केली आहे. आज दुपारी रामलीला मैदानात त्यांचा शपथविधी सोहळा पार पडणार आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Rekha Gupta ‘शीशमहल’चा काय होणार?
दिल्लीचे माजी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या वास्तव्यामुळे चर्चेत राहिलेल्या ‘शीशमहल’बाबत अनेक चर्चा रंगल्या होत्या. या बंगल्याच्या नूतनीकरणासाठी कोट्यवधी रुपये खर्च झाल्याचा आरोप केजरीवाल यांच्यावर झाला होता. आता भाजपच्या मुख्यमंत्री रेखा गुप्ता यांनी शपथविधीपूर्वीच या बंगल्याबाबत मोठा निर्णय घेतला आहे.
Rekha Gupta :शीशमहल म्युझियममध्ये रूपांतरित होणार
बुधवारी संध्याकाळी भाजपच्या प्रदेश कार्यालयात रेखा गुप्ता यांनी एनडीटीव्हीशी संवाद साधला. या मुलाखतीत त्यांनी स्पष्ट केले की, “शीशमहल ही वास्तू आता म्युझियममध्ये रूपांतरित करण्यात येईल. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी दिलेले प्रत्येक वचन आम्ही पूर्ण करू.” त्यांनी या पदासाठी निवड झाल्याबद्दल पक्षाचे आभार मानले.
Rekha Gupta : ‘शीशमहलमध्ये मी राहणार नाही’
न्यूज १८ शी संवाद साधताना, रेखा गुप्ता यांना विचारण्यात आले की, “तुम्ही शीशमहलमध्ये राहणार का?” यावर उत्तर देताना त्यांनी स्पष्ट केले, “अजिबात नाही. हा जनतेच्या मेहनतीच्या पैशातून उभारलेला महल आहे. मी तो पुन्हा जनतेला समर्पित करत आहे. नागरिकांनी तो पाहावा आणि त्यांच्या पैशांचा कसा वापर झाला, याची जाणीव व्हावी.”
शीशमहलवरून वर्षानुवर्षे सुरू असलेला वाद
दिल्लीमधील ६ फ्लॅगस्टाफ रोड येथे असलेल्या या बंगल्याबाबत भाजप आणि आप या दोन्ही पक्षांमध्ये अनेक वर्षे वाद सुरू होता. आरोप होते की, अरविंद केजरीवाल यांनी आजूबाजूच्या बंगल्यांचे संलग्नीकरण करून त्यावर कोट्यवधी रुपये खर्च केले. आता भाजप सरकारच्या निर्णयामुळे हा वाद संपुष्टात येईल का, हे पाहणे महत्त्वाचे ठरेल.