उपरस्त्यावरील उभी वाहने ठरताये अपघाताला कारणीभूत
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
नाशिकरोड : प्रतिनिधी
नाशिक – सिन्नर महामार्गाची निर्मिती झाल्यापासून उपरस्त्यावर (सर्व्हिस रस्ता) अतिक्रमण असुन त्यात वाहन चालक वाहने उभी करुन इकडे तिकडे जात असल्याने अनेकदा इतर येणाऱ्या जाणाऱ्या वाहन धारकांना या गोष्टीचा त्रास होत असुन अपघात होत असतात त्या वाहनधारकासह अतिक्रमित दुकानदारांनवरती कारवाई करण्याची मागणी राष्ट्रवादी युवक काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे जिल्हाकार्यध्यक्ष गणेश गायधनी यांनी राष्ट्रीय महामार्गाचे कार्यकारी अभियंता संजय शेवाळे यांच्या कडे निवेदनाद्वारे केली आहे.तर येत्या दोन दिवसात संबधितावरती कार्यवाही करु असे अश्वासन संबंधित अधिका-यांनी दिली.

गेली अनेक दिवसांपासून उपरस्त्यावरील होणारे स्थानिक दुकानदाराचे अतिक्रमणे तातडीने थांबवावी अशी मागणी होत असतानां देखील या गोष्टी कडे टोल प्रशासन, राष्ट्रीय महामार्ग विभाग व सार्वजनिक बांधकाम तसेच पोलीसाकडे देखील तक्रार केली गेली होती.मात्र आज पावेतो चेहडी ते शिंदेगावा पर्यंतचा उपरस्ता (सर्व्हिस रोड) वरती मोठ्या प्रमाणात आज ही वाहने सर्रासपणे उभी रहातात त्यावरती कारवाई करुन छोट्या मोठ्या वाहन धारकांना रस्ता मोकळा करुन द्यावा. जर उपरस्त्यावर वाहन उभी नसती अथवा अतिक्रमण नसते तर कदाचित चार दिवसापूर्वी झालेल्या अपघातात दोन व्यक्तीना आपला जीव गमवावा लागला नसता असा सवाल संबधितांशी चर्चे दरम्यान केला.अजून किती जणाचा जीव घेणार असे सांगत तातडीने सर्व्हिस रोडवरील उभ्या रहाणा-या वाहनावरती कारवाई व अतिक्रमण झालेला रस्ता मोकळा करून प्रवाशांना तो रस्ता ये जा करण्यासाठी अडचण होणार नाही याची दक्षता घ्यावी अशी मागणी देखील केली गेली आहे.
यावेळी राष्ट्रवादी युवक काँग्रेसचे जिल्हाकार्यध्यक्ष गणेश गायधनी, सामाजिक कार्यकर्ते नंदु चव्हाण आधी उपस्थित होते.