Sachin Tendulkar : सचिन तेंडुलकरचा सन्मान! BCCI कडून ‘कर्नल सीके नायडू जीवन गौरव पुरस्कार’

Sachin Tendulkar 1

मुंबई, – भारतीय क्रिकेट नियामक मंडळाने (BCCI) क्रिकेटचा देव मानल्या जाणाऱ्या सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) प्रतिष्ठित ‘कर्नल सीके नायडू जीवन गौरव पुरस्कार’ देऊन गौरवले आहे. मुंबईतील बीसीसीआयच्या ‘नमन पुरस्कार’ सोहळ्यात हा मानाचा पुरस्कार सचिन तेंडुलकरला प्रदान करण्यात आला.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

बीसीसीआयचे माजी अध्यक्ष आणि आयसीसीचे विद्यमान अध्यक्ष जय शाह यांच्या हस्ते सचिनला हा पुरस्कार प्रदान करण्यात आला. सचिन मंचावर येताच उपस्थितांनी उभं राहून त्याचा उत्स्फूर्त जयघोष केला. विशेष म्हणजे, बीसीसीआयने सचिनच्या क्रिकेट प्रवासावर आधारित एक खास व्हिडिओ तयार केला होता, जो पुरस्कार सोहळ्यादरम्यान सादर करण्यात आला.

https://twitter.com/BCCI/status/1885708214207234176?ref_src=twsrc%5Etfw%7Ctwcamp%5Etweetembed%7Ctwterm%5E1885708214207234176%7Ctwgr%5Ec35346b25500ff161302d1afe77835dbf456eb89%7Ctwcon%5Es1_&ref_url=https%3A%2F%2Fwww.loksatta.com%2Fkrida%2Fsachin-tendulkar-ck-naydu-lifetime-achievement-award-by-bcci-in-naman-awards-2023-24-bdg-99-4864766%2F

सचिन तेंडुलकरच्या (Sachin Tendulkar) क्रिकेट कारकिर्दीकडे पाहिल्यास, त्याने भारतासाठी २०० कसोटी सामने, ४६३ एकदिवसीय सामने आणि १ टी-२० सामना खेळला आहे. त्याच्या नावावर आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये सर्वाधिक धावा करण्याचा विक्रम असून, १०० शतकं झळकावणारा तो एकमेव क्रिकेटपटू आहे.

कसोटी क्रिकेट: १५,९२१ धावा | सरासरी: ५३.७८ | शतकं: ५१,एकदिवसीय क्रिकेट: १८,४२६ धावा | सरासरी: ४४.८३ | शतकं: ४९,टी-२०: १ सामना | १० धावा

१९८९ मध्ये अवघ्या १६व्या वर्षी आंतरराष्ट्रीय क्रिकेटमध्ये पदार्पण करणाऱ्या सचिनने २०१३ मध्ये क्रिकेटला अलविदा केला. २०११ च्या विश्वचषक विजेतेपदात त्याने महत्त्वाची भूमिका बजावली होती. त्याच्या खेळीने क्रिकेटप्रेमींना आनंद दिला असून तो आजही युवा खेळाडूंसाठी प्रेरणास्रोत आहे.

सचिन तेंडुलकरला (Sachin Tendulkar) मिळालेला ‘कर्नल सीके नायडू जीवन गौरव पुरस्कार’ हा केवळ त्याच्या कारकिर्दीचा गौरव नसून, भारतीय क्रिकेटसाठी दिलेल्या योगदानाची पोचपावती आहे. क्रिकेटचा मास्टर ब्लास्टर म्हणून ओळखला जाणारा सचिन आजही अनेकांसाठी एक दंतकथा आहे.