काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री बाळासाहेब थोरात यांचा संगमनेर विधानसभा मतदारसंघातून पराभव झाला आहे. थोरात यांनी आतापर्यंत आठ वेळा विधानसभा निवडणूक जिंकली होती, मात्र या नवव्या निवडणुकीत त्यांना पराभवाचा सामना करावा लागला. हा पराभव काँग्रेससाठी आणि महाविकास आघाडीसाठी मोठा धक्का मानला जात आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
थोरात यांच्या पराभवाबाबत आश्चर्य व्यक्त केले जात असून, त्यांची शांत, संयमी आणि मुत्सद्दी नेता म्हणून ओळख होती. काँग्रेसचे महत्त्वाचे नेते असलेल्या थोरात यांना मुख्यमंत्रिपदासाठी प्रमुख दावेदार मानले जात होते. मात्र, निवडणुकीत मिळालेल्या पराभवामुळे काँग्रेससाठी हा मोठा झटका मानला जात आहे.
महायुतीचा महाराष्ट्रात विजयाचा जोर*
या निवडणुकीत महाराष्ट्रात महायुतीने प्रचंड आघाडी घेतली आहे. महायुतीने २०० हून अधिक जागांवर विजय मिळवून मोठा यश संपादन केल्याचे दिसून येते. “लाडकी बहीण योजना” आणि “विकासाचे मुद्दे” यांसारख्या घोषणा मतदारांवर प्रभाव पाडण्यात यशस्वी ठरल्याचे स्पष्ट होत आहे.
महाविकास आघाडीला अवघ्या ४९-५० जागांवर समाधान मानावे लागल्याचे निकाल दर्शवत आहेत. काँग्रेसचे पृथ्वीराज चव्हाण आणि नाना पटोले देखील पिछाडीवर आहेत.
महाविकास आघाडीला फटका
२०१९ मध्ये महायुतीला जनतेचा कौल मिळाला होता. मात्र शिवसेना आणि भाजपामधील मुख्यमंत्रिपद वाटपावरून मतभेद झाल्यानंतर महाविकास आघाडी स्थापन झाली होती. उद्धव ठाकरे यांच्या नेतृत्वाखालील सरकार २०२२ मध्ये कोसळले, आणि त्यानंतर महायुतीची राजकीय गणितं अधिक मजबूत झाली.