गॅस पाईप, वायर चाबूक, लोखंडी पाईप आणि बांबूच्या काठीने मारहाण
Santosh Deshmukh murder case : बीड जिल्ह्यातील मस्साजोग गावचे सरपंच संतोष पंडितराव देशमुख यांच्या हत्येचा तपास आता निर्णायक वळणावर आला आहे. त्यांच्या निर्घृण हत्येनंतर केलेल्या तपासात एक महत्त्वपूर्ण अहवाल समोर आला आहे. चार विशेष हत्यारांचा वापर करून देशमुख यांना मारहाण करण्यात आली होती, हे आता स्पष्ट झाले आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
अपहरण, बेदम मारहाण आणि 150 जखमा (Santosh Deshmukh murder case)
9 डिसेंबर 2024 रोजी संतोष देशमुख यांचे अपहरण करण्यात आले. त्यानंतर त्यांना गॅसचा पाईप, गाडीच्या वायरचा चाबूक, बांबूची काठी आणि लोखंडी पाईप यांसारख्या घातक हत्यारांनी अमानुषपणे मारहाण करण्यात आली. विशेष म्हणजे, मारहाण करतानाचे व्हिडीओ देखील आरोपींनी रेकॉर्ड केले होते.
तपास यंत्रणेकडून सादर करण्यात आलेल्या अहवालानुसार, देशमुख यांच्या शरीरावर तब्बल 150 हून अधिक जखमा आढळल्या. हे हत्यार इतके प्राणघातक होते की, अशा मारहाणीत एखाद्याचा मृत्यू होऊ शकतो, असंही स्पष्ट नमूद करण्यात आलं आहे.
कराड गॅंगकडून खास बनवलेली हत्यारे (Santosh Deshmukh murder case)
या प्रकरणात आणखी धक्कादायक बाब म्हणजे, ही चारही हत्यारे कराड गॅंगने विशेष बनवली होती, असा उल्लेखही अहवालात करण्यात आला आहे. यापूर्वी देखील या गँगने अन्य लोकांना याच हत्यारांनी मारहाण केल्याचे उघड झाले आहे.
न्यायालयात अहवाल सादर; कारवाईची मागणी तीव्र (Santosh Deshmukh murder case)
या हत्येने बीड जिल्ह्यात मोठा तणाव निर्माण केला होता. केज आणि मस्साजोग परिसरात संतोष देशमुख यांच्या हत्येविरोधात आंदोलन छेडण्यात आले. ग्रामस्थ आणि कुटुंबीयांनी तात्काळ न्यायाची मागणी केली. या पार्श्वभूमीवर, तपास यंत्रणेकडून न्यायालयात जो अहवाल सादर करण्यात आला आहे, तो या प्रकरणात अत्यंत महत्त्वाचा मानला जात आहे.