सातारा जिल्ह्याच्या काले गाव येथील महात्मा गांधी विद्यालय इमारतीचे उद्घाटन आज माझ्या हस्ते झाले. या कार्यक्रमाच्या निमित्ताने रयत शिक्षण संस्थेचे चेअरमन श्री. चंद्रकांत दळवी, संघटक डॉ. अनिल पाटील, व्हाईस चेअरमन भगीरथ शिंदे, माजी खासदार श्रीनिवास पाटील, विकास देशमुख आजच्या या कार्यक्रमासाठी अगत्याने उपस्थित असलेले डॉ. विश्वजीत कदम, आमदार बाळासाहेब पाटील प्रभाकर देशमुख नरेंद्र पवार डॉक्टर सदाशिव कदम अन्य संगे सहकारी आणि उपस्थितांशी संवादही साधता आला.
आजचा दिवस रयत शिक्षण संस्थेच्या स्थापनेनंतरचा १३७ वा स्वागताचा दिवस आहे. सामान्य माणसाच्या कुटुंबातील मुला मुलींना शिक्षणाचे दरवाजे खुले करावे यासाठी एक व्रत घेतलेल काम अण्णांनी आपल्या आयुष्यामध्ये केलं. अण्णांसमोर काही व्यक्ती आदर्श होत्या त्यामध्ये प्रामुख्याने महात्मा ज्योतिबा फुले, राजश्री शाहू महाराज, डॉ. बाबासाहेब आंबेडकर या सगळ्यांच्या सत्यशोधक चळवळीचा आणि प्राकृतिक विचाराचा पुरस्कार करण्याचं काम अण्णांनी जीवन रेषा म्हणून स्वीकारली होते. या कामात यश यायचं असेल तर मुलं शिकली पाहिजेत, त्यांच्यासाठी शिक्षणाचे दरवाजे खुले झाले पाहिजेत, साधन मिळाली पाहिजेत ही भूमिका त्यांनी अंतकरणापासून स्वीकारले. त्याची सुरुवात कुठून करावी यासाठी काले या गावाचा उल्लेख करावा लागेल. हे गाव स्वातंत्र्याच्या चळवळीत संघर्ष करणारं स्वातंत्र्यसैनिकांचे गाव म्हणून ओळखलं जातं. हा सगळा परिसर हा इतिहासाचा भाग झाला. या गावातील ५७ लोकांनी स्वातंत्र्य सैनिकाची जबाबदारी आपल्या शिरावर घेतली आणि त्या संघर्षात सहभागी झाले.
लोकांमध्ये जागृती करणे सत्यशोधकी विचार सांगणार तो लोकांपर्यंत पोहोचवणं यासाठी अनेकांनी कष्ट घेतले. त्यात संदर्भात शांताराम काकडे आणि या गावचे सुपुत्र कै. इस्माईल मुल्ला या दोघांची आठवण या ठिकाणी करून देणे आवश्यक आहे. मुल्ला साहेबांनी आपल्या आयुष्याचा संपूर्ण काळ हा अण्णांचे सहकारी म्हणून झोकून दिला. अशाच या प्रयत्नातूनच काळेगाव येथे विद्यालय सुरू व्हावं अशी मागणी त्यांनी अण्णांकडे केली होती. अण्णांनी ती मागणी पूर्ण केली त्यातून या विद्यालयाचा जन्म झाला.
महात्मा गांधी या देशामध्ये स्वातंत्र्यासाठी प्रयत्नांची पराकाष्टा करणारे नेते होते. गांधीजींचे वैशिष्ट्य होतं की इंग्रज गेले पाहिजे पण नुसतं इंग्रज जाऊन चालणार नाही तर लोकांच्या जीवनात परिवर्तन करण्यासाठी विधायक कार्यक्रम घेणं गरजेचं आहे. तू कार्यक्रम यशस्वी होण्यासाठी शिक्षणाकडे दुर्लक्ष करून चालणार नाही. कर्मवीर अण्णा गांधीजींच्या विचाराचे प्रेरक होते. अण्णांनी हा निकाल घेतला की महात्मा गांधींच्या नावाने मी अनेक विद्यालय काढली हा त्यांचा निर्धार पूर्ण करण्यासाठी त्यांनी अनेक ठिकाणी शाखा महात्मा गांधीजींच्या नावाने काढल्या. शाखेच्या मालिकेमध्ये काल्याची शाखा सुद्धा आवश्यक येते. ही शाखा महात्मा गांधींच्या नावाने सुरू करण्याचा निकाल हा त्यांनी १९७८ साली घेतला. आजपर्यंत ही शाळा उत्तम प्रकारे काम करते आहे.
शिक्षण आणि त्याचा विस्तार याची गरज आहे. आताच्या काळात नवनवीन आव्हानं येत आहेत त्याला सामोरे जाण्यासाठी शिक्षणामध्ये गुणवत्ता आणि दर्जा यामध्ये अधिक लक्ष घालण्याची गरज आहे. तंत्रज्ञान आणि इतर नवीन संशोधन याची विचारधारा नव्या पिढीच्या मनामध्ये निर्माण व्हावी याची आवश्यकता आहे. त्यामुळे आम्हा लोकांचा प्रयत्न रयत शिक्षण संस्थेच्या वतीने असा आहे की आज काल्याला आपण ही वास्तू तयार केली उत्तम शिक्षण देण्याचा प्रयत्न करतोय अण्णांच्या जीवनाचा संबंध इतिहास या ठिकाणी आलेल्या प्रत्येक व्यक्तीला समजेल त्याची काळजी आपण या ठिकाणी घेतली. हे करत असताना अजून काही गोष्टी करण्याची गरज आहे. त्यासाठी काही सुविधा या ठिकाणी असण्याची गरज आहे.
आज या ठिकाणी शाळेची इमारत बांधण्यासाठी गावच्या लोकांनी पुढाकार घेतला याचा आनंद आहे. अपेक्षेपेक्षा जास्त रक्कम गोळा केली याचा आनंद आहे. त्यामुळे संस्थेच्या माध्यमातून इतर गोष्टींची असलेली आवश्यकता पूर्ण करण्याचे काम आम्ही केले. यामधून आज ही सुंदर वास्तू या ठिकाणी उभी राहिली. या ठिकाणी विद्यार्थी अनेक दृष्टीने पुढे यशस्वी होतील अशा पद्धतीने तयार झाले पाहिजे. हे पिढी तयार करण्यासाठी इतर उपक्रम हाती घेतली पाहिजे. आज संगणकाचे युग आहे. या युगात आधुनिक संगणक विद्यार्थ्यांना देता येतील का, तसेच संस्थेच्या वतीने यात आणखी काही हातभार लावावा अशा काही गोष्टी आमच्या नजरेसमोर आहेत. मला एका गोष्टीचा आनंद आहे की काले हे गाव एखादा काम हाती घेतल्यानंतर ते पूर्ण केल्याशिवाय शांत राहत नाही, स्वस्त बसत नाही आज तुमच्या गावचा लौकिक आहे. संस्थेच्या शाखेत आणखी ज्या सुधारणा करायच्या आहेत त्या मोहिमेशी बांधलेले विकास पाटील आणि आमच्या संस्थेचे दुसरे शाखाप्रमुख यांनी काही मागणी आमच्याकडे केली. त्यासाठी किमान ५० लाखाच्या निधीची आवश्यकता आहे. संस्थेच्या तसेच अन्य मार्गाने या कामासाठी एक कोटी रुपये आम्ही उभे करून देऊ. एक चांगली वास्तू आज या ठिकाणी झाली. मुलांना उत्तम प्रकारच्या शिक्षणासाठी सुविधा द्यावी तसेच आधुनिकतेचा आधार घेऊन अधिक चांगली सुविधा त्यांना देऊ. आज देश पातळीवर आमच्या शाळेची बाहेर पडलेली मुलं मुली आपलं कर्तृत्व आणि बुद्धिमत्ता दाखवतील अशी त्यांची तयारी आम्ही करून घेऊ हीच खात्री सर्वांना देतो.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.