सातपूर आयटीआयमध्ये संविधान मंदिराचे उद्घाटन

Satpur ITI Madhye sanvidhan Mandir aache udghatan

नाशिक : येथील शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्थेत (आयटीआय) उपराष्ट्रपती जगदीप धनखड यांच्या हस्ते आभासी पद्धतीने संविधान मंदिराचे उद्घाटन करण्यात आले. उद्घाटन समारंभ प्रसंगी आमदार सीमाताई हिरे, मराठा विद्या प्रसारक समाज संस्थेचे सचिव/ बार कौन्सिल नाशिकचे अध्यक्ष ऍड नितीन ठाकरे, सहसंचालक मुंडासे, नगरसेविका हर्षदा गायकर, ऍड प्रशांत लांडगे, ऍड राकेश आडके, ऍड पि, व्ही शेगावकर उपस्थित होते. श्री ठाकरे यांनी मार्ग मार्गदर्शन करताना संविधान मंदिराचे उद्घाटन ही एक ऐतिहासिक घटना आहे असे सांगितले आमदार सीमाताई हिरे यांनी संविधान संविधानाबद्दल जागृती व्हावी संविधानाचे महत्त्व जनसामान्य पर्यंत पोहचावे शेवटच्या माणसाला न्याय हक्क मिळावा नवीन पिढी सुसंस्कृत पिढी निर्माण व्हावी असे सांगितले नगरसेविका हर्षदा गायकर यांनी जागतिक लोकशाही दिनाच्या शुभेच्छा देताना संविधान मंदिराचा लाभ सर्व प्रशिक्षणार्थ्यांनी घ्यावा असे आवाहन केले
यावेळी उपस्थित विधीज्ञांनी एडवोकेट प्रशांत लांडगे यांनी संविधानाची निर्मिती कशी झाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी घटना तयार करताना केलेले कष्ट आणि घटनेची वैशिष्ट्ये मूलभूत अधिकार व विद्यार्थ्यांसाठी कशा पद्धतीने ते महत्त्वाचे आहे यावर मार्गदर्शन केले अध्यक्ष भाषणात रवींद्र मुंडासे यांनी आयटीआय मध्ये विविध तांत्रिक प्रशिक्षण व्यतिरिक्त आता संविधानाचे महत्त्व विद्यार्थ्यांना कळेल याकरता प्रयत्न करण्यात येणार आहेत लोकशाहीचे चार स्तंभ व त्यांचे महत्त्व सांगितले स्वातंत्र्यपूर्व काळातील लोकशाही व त्याकाळच्या राज्यघटने विषयी माहिती दिली तसेच भारताच्या संविधानाची वैशिष्ट्ये, मूलभूत अधिकार, कर्तव्य प्रशिक्षणार्थ्यांना समजावून सांगितली. यावेळी संविधानावर आयोजित निबंध स्पर्धा, वृत्तलेख स्पर्धा, वक्तृत्व स्पर्धा, चित्रकला स्पर्धा यामध्ये प्राविण्य मिळवलेल्या प्रशिक्षणार्थींचा गौरव करण्यात आला.
सूत्रसंचालन गटनिदेशक चोपडे यांनी केले, तर उपप्राचार्य मोहन तेलंगे यांनी आभार मानले.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

Leave a Reply