पुणे : राजकीय वर्तुळात सध्या शरद पवार गटात (Sharad Pawar Gat) आणखी एका मोठ्या नेत्याच्या प्रवेशाची जोरदार चर्चा आहे. या चर्चेला अधिक जोर आला तेव्हा सुप्रिया सुळे यांच्या गाडीतून बाहेर पडणाऱ्या एका व्यक्तीने मीडियाच्या कॅमेऱ्यापासून आपला चेहरा लपवण्याचा प्रयत्न केला.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
ही घटना ‘मोदी बागे‘तून बाहेर पडताना घडली. त्या व्यक्तीने चेहरा लपवला असला तरी, त्याचा राजकीय बडेजाव आणि महत्त्व लक्षात घेता, हा नेता शरद पवारांच्या गळाला लागण्याची शक्यता वर्तवली जात आहे. राष्ट्रवादी काँग्रेसच्या राजकारणात हा प्रवेश नवा वळण देणारा ठरू शकतो, असे काही जाणकारांचे मत आहे.
आता हा चेहरा लपवणारा नेता कोण? याबद्दल अनेक अंदाज लावले जात आहेत. काही सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, हा व्यक्ती महाराष्ट्राच्या राजकारणात एक बडा नेता असून, त्यांचा राष्ट्रवादीत प्रवेश हा येत्या निवडणुकीत महत्त्वाचा टप्पा ठरू शकतो.
राजकीय वर्तुळात या घटनेची जोरदार चर्चा असून, शरद पवार यांच्या नेतृत्वाखालील राष्ट्रवादीत नवीन बदल होण्याचे संकेत मिळत आहेत.