Share Bazzar: आठवड्याचा शेवट धमाकेदार, सेन्सेक्स १,९६१ अंकांनी उसळला!

SHEAR BAZARAT ATHVADYACHA SHEVAT DHAMAKEDAR

शुक्रवारी शेअर बाजाराने जबरदस्त उसळी घेतली. सेन्सेक्स १,९६१ अंकांनी वधारून ७९,११७ अंकांवर बंद झाला, तर निफ्टीही ५५७ अंकांनी वधारून २३,९०७ अंकांवर पोहोचला. मागील पाच महिन्यांतील ही सर्वात मोठी तेजी ठरली आहे. यामुळे गुंतवणूकदारांच्या संपत्तीत तब्बल ७.१५ लाख कोटी रुपयांची भर पडली.

दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.

अदानी समूहाचे शेअर्स तेजीत

गुरुवारी अमेरिकेत गौतम अदानी यांच्यावर कथित लाच प्रकरण व फसवणुकीचे आरोप झाले होते. त्यामुळे समूहाच्या शेअर्समध्ये मोठी घसरण झाली. मात्र शुक्रवारी अदानी समूहातील बहुतेक कंपन्यांचे शेअर्स वधारले, ज्यामुळे गुंतवणूकदारांना दिलासा मिळाला.

सेन्सेक्समधील ३० पैकी २९ शेअर्स वधारले

सेन्सेक्समधील स्टेट बँक ऑफ इंडियाचे शेअर्स ४.३४% वाढले. त्याशिवाय आयटीसी, टायटन, इन्फोसिस, टीसीएस यांच्या शेअर्समध्येही वाढ झाली. मात्र, एचडीएफसी बँकेचे समभाग किरकोळ प्रमाणात घसरले.

जागतिक बाजाराचे संमिश्र परिणाम

दक्षिण कोरियाचा कोस्पी आणि जपानचा निक्केई वधारला.

चीनचा कंपोझिट आणि हाँगकाँगचा हेंगसेंग घसरला.

युरोपातील बाजार कमजोर तर अमेरिकन बाजारात तेजी पाहायला मिळाली.

गुंतवणूकदारांची संपत्ती वाढली

गुंतवणूकदारांच्या संपत्तीत शुक्रवारी मोठी भर पडली. बाजार भांडवल ४२५.३८ लाख कोटींवरून ४३२.५३ लाख कोटींवर पोहोचले. एका दिवसात ७.१५ लाख कोटी रुपयांची संपत्ती वाढ झाली.

महत्त्वाची आकडेवारी

आठवडाभरात सेन्सेक्सने १,५३७ अंकांची झेप घेतली.

शुक्रवारी बाजारात ४,०४१ शेअर्समध्ये व्यवहार झाले, त्यातील २,४५२ शेअर्स वाढले, तर १,४६९ घसरले.

१६३ समभागांनी ५२ आठवड्यांचा उच्चांक सर केला.

विदेशी गुंतवणूकदारांचा सहभाग

गुरुवारी विदेशी गुंतवणूकदार संस्थांनी ५,३२० कोटींची विक्री केली, तर घरगुती गुंतवणूकदार संस्थांनी ४,२०० कोटींची खरेदी केली.

शुक्रवारीच्या तेजीमुळे गुंतवणूकदारांमध्ये उत्साहाचे वातावरण होते, आणि पुढील आठवड्यासाठी बाजाराकडून सकारात्मक अपेक्षा निर्माण झाल्या आहेत.