कृष्णा बाजीराव भागवत वय- 38 वर्षे, धंदा- शेती रा.एरंडगाव ता.शेवगाव जि.अहमदनगर यांचे फिर्यादीवरुन शेअर मार्केट ट्रेडींगच्या नावाखाली एकुण- 1 कोटी 1 लाख रुपयांची फिर्यादी व साक्षीदार यांचा विश्वास संपादन करुन फसवणुक झाल्याचे फिर्यादीत नमुद केल्याने फिर्यादी यांनी दिलेल्या फिर्यादीवरुन शेवगांव पोलीस ठाण्यात कलम -420,406 प्रमाणे दिनांक-29/07/2024 रोजी गुन्हा दाखल करण्यात आला होता.
मा.पोलीस निरीक्षक समाधान नागरे शेवगाव पोलीस स्टेशन यांना गुप्त बातमीदारामार्फत माहीती मिळताच कैलास दत्तात्रय भागवत रा.एऱंडगाव ता.शेवगाव जि.अहमदनगर हा इंदोर मध्यप्रदेश राज्य येथे असल्याची बातमी मिळाल्याने त्यांनी तपासाची चक्रे वेगाने फिरवुन पोलीस पथक तयार करुन इंदोर मध्यप्रदेश राज्य येथे आरोपीस ताब्यात घेण्यासाठी पाठविण्यात आले होते. तपास पथकाने इंदोर मध्यप्रदेश राज्य येथे जावुन चिकीस्सानगर लसुडीया पोलीस स्टेशन इंदोर येथुन आरोपी यास भाड्याने राहत असलेल्या लाँजवरुन दिनांक- 18/09/2024 रोजी ताब्यात घेवुन त्यास शेवगाव पोलीस स्टेशन येथे अटक करण्यात आली आहे.
सदरची कारवाई ही मा.पोलीस अधिक्षक श्री राकेश ओला अहमदनगर, मा.अपर पोलीस अधिक्षक श्री.प्रशांत खैरे अहमदनगर, मा.उपविभागिय पोलीस अधिकारी श्री सुनिल पाटील सो उपविभाग शेवगांव यांचे मार्गदर्शनाखाली पो.नि.श्री समाधान नागरे, पोसई विशाल लहाणे, पोहेकाँ परशुराम नाकाडे, पोकाँ मोहिते, पोकॉ शाम गुंजाळ, पोकॉ संतोष वाघ, पोकाँ राहुल खेडकर, पोकाँ फलके, पोकाँ बाप्पासाहेब धाकतोडे तसेच नगर दक्षिण सायबर सेलचे पोकाँ राहुल गुंडु यांनी केली असुन वरिल गुन्ह्यांचा तपास पोसई विशाल लहाणे हे करत आहेत.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.