माजी नगरसेवकांचा शिंदेसेनेत प्रवेशाचा सपाटा सुरू
नाशिक : महापालिका निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिंदेसेना(Shinde Sena) आक्रमक भूमिका घेत आहे. अन्य पक्षांतील माजी नगरसेवकांना पक्षात सामील करून घेण्याचा सपाटा सुरूच ठेवत, बुधवारी (दि. १२) सातपूरमध्ये मोठा राजकीय इनकमिंग पाहायला मिळाला.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Shinde Sena : मनसे आणि उद्धवसेनेच्या माजी नगरसेवकांचा प्रवेश
बुधवारी रात्री मनसेचे माजी नगरसेवक योगेश शेवरे आणि उद्धवसेनेचे माजी नगरसेवक पवन पवार यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला. तसेच, महिला काँग्रेसच्या जिल्हाध्यक्ष वंदना पाटील यांनीही काँग्रेसला सोडचिठ्ठी देत शिंदेसेनेचे शिवबंधन बांधले.
Shinde Sena : शुक्रवारी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची मोठी सभा
शिंदेसेनेत होत असलेल्या मोठ्या इनकमिंगच्या पार्श्वभूमीवर, शुक्रवारी (दि. १४) उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे नाशिक दौऱ्यावर येणार आहेत.
- हुतात्मा अनंत कान्हेरे मैदानावर सायंकाळी त्यांची सभा होणार आहे.
- यावेळी उद्धवसेनेचे अनेक पदाधिकारी, माजी नगरसेवक आणि काँग्रेसचे काही नेते शिंदेसेनेत प्रवेश करणार असल्याची जोरदार चर्चा आहे.
- आतापर्यंत २३ माजी नगरसेवक आणि पदाधिकाऱ्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला आहे.
शिंदेसेनेत(Shinde Sena) मोठ्या प्रमाणावर इनकमिंग
महापालिका निवडणुकीपूर्वी, नाशिकमध्ये उद्धवसेनेसह इतर पक्षांतील अनेक नेते शिंदेसेनेकडे वळत आहेत. विशेष म्हणजे,
- विधानसभा निवडणुकीच्या वेळी पवन पवार आणि इंदुमती नागरे यांनी उद्धवसेनेत प्रवेश केला होता, मात्र काही महिन्यांतच त्यांनी शिंदेसेनेत प्रवेश केला.
- याआधी दिल्लीत काँग्रेसच्या ज्येष्ठ नेत्या डॉ. हेमलता पाटील, तसेच उद्धवसेनेच्या माजी उपमहापौर रंजना बोराडे आणि माजी नगरसेवक दीपक दातीर यांनीही शिंदेसेनेत प्रवेश केला होता.
शिंदेसेनेच्या विजयासाठी जोरदार तयारी
या प्रवेश सोहळ्यात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सर्वांचे स्वागत केले. यावेळी शिंदेसेनेचे सहसंपर्कप्रमुख राजू लवटे, महानगरप्रमुख प्रवीण तिदमे आणि माजी नगरसेवक विक्रम नागरे उपस्थित होते.
महापालिका निवडणुकीपूर्वी शिंदेसेनेत होत असलेले हे मोठे इनकमिंग पक्षासाठी संजीवनी ठरणार आहे का? हे येणाऱ्या काळात स्पष्ट होईल.