Shirdi Sai Baba: हैदराबादच्या साईभक्ताची मोठी देणगी
Shirdi: शिर्डीच्या श्री साईबाबा समाधी मंदिराच्या कळसाला तब्बल १६ वर्षांनंतर पुन्हा सुवर्ण मुलामा देण्यात येत आहे. हैदराबाद येथील साईभक्त विजयकुमार यांच्या देणगीतून हे काम सुरू असून, त्यांनी २००७ मध्येही कळसाला सोन्याचा मुलामा दिला होता.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
Shirdi साई मंदिराचे वैभव वाढणार!
श्री साईबाबा संस्थान हे देशातील दुसऱ्या क्रमांकाचे सर्वाधिक समृद्ध देवस्थान आहे. येथे येणाऱ्या भाविकांच्या देणगीतून अनेक सामाजिक उपक्रम राबवले जातात. विजयकुमार यांच्यासारख्या अनेक साईभक्तांनी मंदिराला मोठ्या प्रमाणावर सोने आणि चांदीच्या वस्तू अर्पण केल्या आहेत. त्यामुळे मंदिराचा ऐतिहासिक आणि धार्मिक महत्व आणखी वृद्धिंगत झाले आहे.
किती सोने वापरण्यात आले?
विजयकुमार यांनी मंदिराच्या कळसाला सुवर्ण मुलामा देण्याची ही दुसरी वेळ आहे. मात्र, यावेळी किती सोने वापरण्यात येत आहे, याची माहिती त्यांनी गुप्त ठेवली आहे. साईबाबा संस्थानचे सीईओ गोरक्ष गाडीलकर यांनी यास दुजोरा दिला आहे.
विद्युत रोषणाई न करण्याचा सल्ला
विजयकुमार यांनी साईबाबा संस्थानला कळसावर विद्युत रोषणाई न करण्याची सूचना दिली आहे. तिरुपती बालाजी आणि द्वारका मंदिरांचा उल्लेख करत त्यांनी सांगितले की, विद्युत बल्बच्या उष्णतेमुळे सोन्याच्या मुलाम्यावर तडे पडू शकतात. त्यामुळे शिखराचे वैभव जपण्यासाठी नैसर्गिक प्रकाशातच त्याची शोभा खुलवावी, असे त्यांचे मत आहे.
Shirdi साई मंदिराच्या भक्तांसाठी सुवर्ण संधी!
शिर्डीच्या साईबाबा मंदिराचा कळस नव्या सोन्याच्या मुलाम्याने अधिक झळाळून उठणार आहे. यापूर्वी सप्टेंबर २०२३ मध्ये मंदिराच्या गाभाऱ्यालाही सुवर्ण मुलामा देण्यात आला होता. त्यामुळे भक्तांसाठी हे एक ऐतिहासिक आणि आनंदाचे क्षण ठरणार आहेत.
He Pan Wacha : History Of Nashik Modakeshwar Ganpati Temple : “मोदकेश्वर गणपती मंदिर – नाशिकचे अद्भुत स्वयंभू गणेश मंदिर”