ठाणे : विधानसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर शिवसेनेच्या शिंदे गटाने Shinde Gat मोठी राजकीय चाल खेळली आहे. उपमुख्यमंत्री आणि शिवसेना नेते एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली नाशिकमधील तीन प्रमुख नेत्यांनी शिवसेनेत प्रवेश केला आहे.
दररोज महत्वाच्या घडामोडी आणि MBC Marathi च्या संपर्कात राहण्यासाठी आमचा सोशल मीडिया फॉलो करा.
नाशिकच्या उबा ठा गटाच्या माजी नगरसेविका इंदुबाई सुदाम नागरे, राष्ट्रवादी काँग्रेसच्या महिला प्रदेश सचिव समिना शोएब मेमन, तसेच किमान वेतन सल्लागार समिती सदस्य विक्रम नागरे यांनी ठाण्यात आयोजित भव्य सोहळ्यात शिवसेनेत प्रवेश केला.
शिवसेनेत प्रवेश करणाऱ्या या नेत्यांमुळे नाशिकमधील शिंदे गट Shinde Gat अधिक मजबूत होत असल्याचे स्पष्ट होते. विक्रम नागरे यांची भाजप कामगार आघाडीतील सरचिटणीसपदाची भूमिकाही महत्त्वाची होती. परंतु, अवघ्या काही दिवसांत त्यांनी पक्षांतर करून शिंदे गटाची ताकद वाढवली.
ठाण्यात पार पडलेल्या या सोहळ्याला उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे, युवानेते खासदार श्रीकांत शिंदे, शिवसेना सचिव भाऊसाहेब चौधरी, उपनेते विजय (अप्पा) करंजकर, तसेच युवती सेना कोअर कमिटी सदस्य हर्षदाताई गायकर यांसारखे अनेक मान्यवर उपस्थित होते.
सातपूर परिसरात आता शिंदे गटाचा Shinde Gat प्रभाव वाढल्याने आगामी निवडणुकांमध्ये राजकीय समीकरणं बदलण्याची शक्यता निर्माण झाली आहे. शिंदे गटाच्या या यशस्वी डावामुळे, नाशिकमधील शिवसेनेला नवी दिशा आणि बळकटी मिळाली आहे.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली शिवसेनेच्या शिंदे गटाने स्थानिक पातळीवर केलेल्या या नेत्यांच्या प्रवेशामुळे पक्षाचा विस्तार अधिक मजबूत होत आहे. नाशिकसारख्या महत्त्वाच्या भागात या नेत्यांच्या प्रभावामुळे शिंदे गटाच्या योजनांना मोठा धक्का बसणार आहे.